Saturday, July 6, 2024

रुपाली गांगुलीचा ‘चका चक’ डान्स पहिला का?, डान्स पाहून नक्कीच पडाल तिच्या प्रेमात

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली ही आज घराघरात सगळ्यांची आवडती अभिनेत्री झाली आहे. तिची ही ओळख संपूर्ण देशभरात तिच्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे मिळाली आहे. या शोचा टीआरपी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मालिकेत रुपाली मुख्य भूमिकेत आहे. या मलिकेची कहाणी काही वेगळी आणि हृदयाला भिडणारी आहे. त्यामुळे मालिका सगळ्यांना आवडत आहे. रुपालीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच रुपालीने सारा अली खानच्या एका सुपरहिट गाण्यावर डान्स केला आहे.

‘अनुपमा’ या मालिकेत तिचे पात्र थोडे सिरियस आहे. परंतु वैयक्तिक आयुष्य मात्र ती खूपच बिंधास्त आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती सारा अली खानच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटातील ‘चका चक’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने प्रेक्षकांना हुक स्टेप रिक्रीएट करण्याचे चॅलेंज दिले आहे. (Anupamma actress rupali Ganguly’s dance video on chaka chak song)

‘अतरंगी रे’ या चित्रपटात हे गाणे सारा अली खानवर चित्रित केले आहे. तिने अनेकवेळा या गाण्यावर परफॉर्मन्स देखील केला आहे. हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. तसेच ए.आर. रहमान शने या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच रुपाली गांगुलीचा सख्खा भाऊ विजय गांगुली याने हे गाणे कोरीओग्राफ केले आहे.

‘अनुपमा’ या मालिकेत अनेक वळणं आली आहेत. परंतु आता मालिकेत एक मोठे वळण आलेले दिसणार आहे. मालिकेतील सेटवरून काही फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये अनुज आणि अनुपमा यांचा अपघात झालेला दिसत आहे. तसेच त्यांच्याबरोबर वनराज देखील दिसत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या भागात काय होणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, महिला स्पर्धकासमोर रणवीर सिंगला झुकवावे लागले डोके? व्हिडिओ जोरदार व्हायरल-काय बिनसलं! सारा अली खान आणि ‘बिग बॉस १५’च्या स्पर्धकामध्ये घडले ‘असे’ काही, अभिनेत्रीनेही चांगलेच सुनावले-‘या’मुळे कुमार सानू यांनी घेतला अनु मलिकचा बदला, ‘सा रे गा मा पा’मध्ये सांगितले कारण

हे देखील वाचा