Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड फिटनेसचा प्रवास जिममध्ये नाही ‘इथे’ सुरू करा, या घ्या खेर यांच्या अनमोल फिटनेस टिप्स

फिटनेसचा प्रवास जिममध्ये नाही ‘इथे’ सुरू करा, या घ्या खेर यांच्या अनमोल फिटनेस टिप्स

अनुपम खेर म्हणजे उत्स्फूर्त अभिनय, विनोदाचे अफलातून टायमिंग आणि वैविध्यपूर्ण भूमिकांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारे नाव. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या खेर यांची ‘कू’ वरची एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. जगण्याच्या विविध पैलुंवर, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विविध सुविचारही ते टाकत असतात. आज खेर यांच्या वैयक्तिक आयुष्यातली एक कमालीची प्रेरक गोष्ट समोर आली आहे.

काही काळापूर्वीच खेर यांनी एक घोषणा केली होती. ती होती वैयक्तिक आयुष्यातील फिटनेस गोलबाबत. आज खेर यांनी काही काळापूर्वीचा आणि आताचा फोटो टाकून आपल्या फिटनेसचा लक्षवेधी प्रवास शेअर केला आहे.

अनुपम खेर यांची ही पोस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पोस्ट करताना खेर लिहितात, “तुमची बदलण्याची इच्छा आता जसे आहात तसे राहण्याच्या इच्छेहून मोठी असली पाहिजे. जिममध्ये जाऊन वजन उचलण्याने तुमचा फिटनेसचा प्रवास सुरू होत नाही. तो सुरू होतो तुमच्या डोक्यात. आजचा दिवस निर्धार करण्यासाठी अतिशय योग्य आहे.” सोबत खेर यांनी #KuchBhiHoSaktaHai #YearOfTheBody #MondayMotivation असे हॅशटॅग्जही वापरले आहेत.

खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘काश्मिर फाइल्स’ 11 मार्चला प्रदर्शित झाला. काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा हा सिनेमा अतिशय लोकप्रिय ठरला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा