Saturday, June 29, 2024

बाबो! तापसी पन्नूसमोरचं अनुराग कश्यपचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘माझे स्तन तिच्यापेक्षा…’

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) त्याच्या ‘दोबारा’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सिने जगतात जोरदार चर्चा रंगली असून चित्रपटात तापसी पन्नूची चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. याच प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनुराग कश्यपने तापसी पन्नूबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) ‘दोबारा’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे सध्या ती जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यपही प्रमोशनसाठी उपस्थित असतात. अशातच सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनुराग कश्यप तापसीबद्दल बोलताना दिसत आहे.

हा व्हिडिओ एका मुलाखतीदरम्यानचा आहे. यावेळी सिद्धार्थ कनन अनुरागला “तुम्हीही एक न्यूडफोटोशूट करा,” असे म्हणताना दिसत आहे. यावर तापसी पन्नू “आता हॉरर शो सुरु करु नका,” असे म्हणते. यावर सिद्धार्थ कननने “तु त्यांच्यावर जळत आहेस का कारण तुला माहितेय की त्यांनी न्यूड फोटोशूट केल्यास त्यांचा लूक व्हायरल होईल,” असे म्हणत तापसीला छेडले असता अनुराग कश्यप यांनी “हो ती खरचं माझ्यावर जळते कारण माझे स्तन तिच्यापेक्षा मोठे आहेत,” असे धक्कादायक वक्तव्य केलेले दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Kannan (@sid_kannan)

सध्या त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी यावरुन अनुराग कश्यपला खडेबोल सुणावले आहेत. तर काही जणांनी चेष्टा करायला ही मर्यादा असते असे म्हणत अनुराग कश्यपच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे.

हेही वाचा – अनुराग कश्यपने करण जोहरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘तो कलाकारांना…’
बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नाकारून करीना कपूरने केली मोठी चूक, आज होतोय पश्चाताप
‘तुम्हाला मी जास्त आवडते की ऐश्वर्या’? स्पर्धकाच्या ‘त्या’ प्रश्नाने लाजून लाल झाले अमिताभ बच्चन

हे देखील वाचा