Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली नात्याची पहिली ऍनिवर्सरी; बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल

अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली नात्याची पहिली ऍनिवर्सरी; बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल

अनुराग कश्यप यांची बॉलिवूडमध्ये एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन कंटेंट दिले आहेत. रोमँटिक चित्रपटांच्या दरम्यान त्यांनी असे चित्रपट दिले आहेत, जे खरेखुरे आयुष्य दर्शवतात. त्यांच्या चित्रपटात ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘देव डी’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘बॉम्बे वेलवेट’ यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो. अनुराग कश्यप हे केवळ त्यांच्या चित्रपटामुळे नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि त्यांच्या लव्ह लाईफमुळे देखील खूप चर्चेत असतात. अनुराग यांच्या प्रमाणेच त्यांची मुलगी आलिया कश्यप देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती देखील खूप चर्चेत असते.

आलियाने भलेही अजुन बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही, पण ती प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिची खूप चांगली फॅन फॉलोविंग आहे. ती यूट्यूबवर स्वतः चं एक चॅनल देखील चालवते. नुकतेच तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत त्यांच्या नात्याची पहिली ऍनिवर्सरी साजरी करताना दिसत आहे.

आलिया तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोईर सोबत ट्रीपवर गेली होती . तिथे त्या दोघांनी क्वालिटी टाइम स्पेंड केला होता. ते दोघेही कर्जतला फिरायला गेले होते. या आधी देखील तिने तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आलियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, ते कर्जत मधील एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नाहीये. तिने सांगितले की, शेन तिच्यासाठी फुलं आणि जेवण घेऊन आला होता.

या व्हिडिओमध्ये तिने हे देखील सांगितले की, ती जेव्हा शेनला वर्चुअल डेट करत होती तेव्हा पासूनच ते रिलेशनमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या रिलेशनची पहिली ऍनिवर्सरी साजरी करण्यासाठी ट्रीप प्लॅन केली होती. त्यांचा हा व्हिडिओ पाहून हे लक्षात येतं आहे की, त्यांनी त्यांची ही ऍनिवर्सरी आनंदाने साजरी केली आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रासोबत घालवलेले सर्वात चांगले ३६५ दिवस. जे मी या दुनियेतील कोणत्याही गोष्टीसाठी बदलू शकत नाही. माझ्यावर प्रेम केल्याबद्द्दल धन्यवाद. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहील.” (Anurag Kashyap’s daughter Aaliyah celebrate 1 st anniversary of her relationship with her boyfriend)

अनुराग कश्यप यांनी फिल्म एडिटर आरती बजाज सोबत लग्न केले होते. परंतु काही कारणांनी २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आलिया ही आरती आणि अनुराग यांची मुलगी आहे. यानंतर त्यांनी अभिनेत्री कल्की केकलासोबत लग्न केले. पण त्यांचं नात देखील जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचा देखील घटस्फोट झाला. अनुराग कश्यप हे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करतात. ते नेहमीच आलियासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या

हे देखील वाचा