दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती


बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि सूत्रसंचालक असलेल्या शेखर सुमन यांच्यावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. शेखर सुमन यांच्या आईचे निधन झाले आहे. शेखर यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर करत लिहिले, “माझी प्रिय आई, मी या जगात सर्वात जास्त जिच्यावर प्रेम केले, त्या माझ्या आईचे निधन झाले आहे. आज मी स्वतः ला अनाथ आणि उध्वस्त समजत आहे. ती नेहमी आमच्यासाठी उपस्थित असायची. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला स्मरणात ठेवेल.”

काही दिवसांपूर्वीच शेखर सुमन यांनी ट्विट करत सांगितले होते की, त्यांच्या आईला कोविशील्डचा दुसरा डोस दिला आहे. मात्र त्यानंतर शेखर यांच्या आईची तब्येत खालावत गेली. त्या किडनीच्या त्रासाने ग्रस्त होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचे किडनी ट्रांसप्लांट झाले होते. शेखर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांच्या आईची प्रकृती खराब असल्याचेही सांगितले होते. मागच्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती.

शेखर सुमन यांचा मुलगा आणि अभिनेता अध्ययन सुमनने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले होते की, “खूप कमी लोकांना माहिती आहे की, मी दर बुधवारी गणपतीच्या मंदिरात जातो, त्यांचा आशीर्वाद आणि उत्तम आरोग्य मागतो. या काही वर्षांमध्ये देव खूप दयाळू राहिला आहे. तुम्ही सर्वानी माझ्या आजीसाठी प्रार्थना करा. ती किडणीच्या आजाराने ग्रस्त आहे.” (shekhar suman mother dies due to kidney disease)

आता पुन्हा अध्ययन सुमनने ट्विट करत लिहिले, “आज आमच्या सर्वांची लाडकी ‘माँ’ शांत झाली. ती खूप शक्तिशाली होती शेवटच्या श्वासापर्यंत लढली. प्रार्थना आणि शांती.”

काही दिवसांपूर्वीच शेखर सुमन यांच्या सासूबाईंचे कोरोनामुळे निधन झाले होते आणि आज त्यांच्या आईचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायक रोहित राऊत गिरवतोय प्रेमाचे धडे! जाणून घ्या कोण आहे त्याच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती

-‘धाकड’ सिनेमासाठी अर्जुन रामपालचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; नवीन लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण

-अभिनेता वरुण सूदला झाली गंभीर दुखापत; ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्टंट करताना झाला अपघात


Leave A Reply

Your email address will not be published.