शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…


शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून बऱ्याचदा ते त्यांचे विनोदी व्हिडीओ शेअर करतात. मागच्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप लाइमलाइटमध्ये आले. मीडियामध्ये राजच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल अनेक बातम्या आल्या. या काळातही या दोघांनी एकमेकांना पूर्ण साथ दिली. एक परफेक्ट सेलिब्रिटी कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते.

मात्र आता शिल्पाने राजबद्दल नुकताच एक खुलासा केला आहे. शिल्पा सध्या ‘सुपर डान्सर ४’ या डान्स रियॅलिटी शोची परीक्षक आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी पाहुणे येत असतात. या आठवड्यात या शोमध्ये लोकप्रिय गायक कुमार सानू हजेरी लावणार आहे. त्यामुळे सर्व स्पर्धक सानू यांच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना आपल्याला दिसणार आहे. या खास भागात विश बाउलचा खेळ रंगणार आहे. या विश बाउलमध्ये सुपर डान्सरमध्ये असलेल्या प्रत्येकाची एक इच्छा लिहिलेली आहे.

या भागात शिल्पाने कुमार सानू यांच्याकडे एक मागणी करत त्यांना,‘कभी हाँ कभी ना’ या चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ हे गाणे गाण्याची विनंती केली. हे गाणे शिल्पाचा पती राज कुंद्राला खूप आवडते असेही शिल्पाने सांगितले. पुढे शिल्पा म्हणाली, “राज एकदम परिपूर्ण आहे, मात्र त्याला गाणे तेवढे गाता येत नाही. ज्यावेळी राजने हे गाणे गाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी मला समजले की, हा कधीच गाणे गाऊ शकणार नाही. आज त्याला कळेल की गाणे कसे गायचे असते.” (shilpa shetty reveled her husband is perfect but raj kundra can not sing)

यावेळी कुमार सानू यांनी सांगितले की, ” ‘वो तो है अलबेला’ हे गाणे मी पहिल्यांदा एखाद्या रियॅलिटी शोमध्ये गाणार आहे. मी कधी राज यांना भेटलो नाहीये. मात्र एक सांगतो ते कितीही वाईट गात असले, तरी जेव्हा कधी त्यांना माझी गरज पडेल, तेव्हा मी त्यांना नक्कीच मदत करेल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायक रोहित राऊत गिरवतोय प्रेमाचे धडे! जाणून घ्या कोण आहे त्याच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती

-‘धाकड’ सिनेमासाठी अर्जुन रामपालचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; नवीन लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण

-अभिनेता वरुण सूदला झाली गंभीर दुखापत; ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्टंट करताना झाला अपघात


Leave A Reply

Your email address will not be published.