‘लग्नाच्या आधी सेक्स केला तर…’, मुलगी आलियाच्या प्रश्नावर अनुराग कश्यपने दिले ‘हे’ उत्तर


बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही देखील त्याच्याप्रमाणेच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. आलियाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. तरी देखील सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. तसेच ती यूट्यूबवर देखील तिचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करताना दिसते. आता देखील तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलियाने तिचे वडील अनुराग कश्यपशी अनेक प्रश्नांवर चर्चा केली. तिच्या या प्रश्नाच्या यादीत एक प्रश्न असा देखील होता की, जर ती लग्नाच्या आधी फिजिकल रिलेशनमध्ये आली, तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल. यावर तिच्या वडिलांनी तिला उत्तर दिले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Anurag Kashyap’s daughter Aliyah Kashyap ask a question to her father about sex before marriage)

आलियाने जेव्हा लग्नाच्या आधी शारीरिक संबंधाविषयी प्रश्न विचारला, तेव्हा अनुराग कश्यप म्हणाले की, “हा एक असा प्रश्न आहे जो आम्ही 80 च्या दशकात विचारत होतो. आता आपल्याला या प्रश्नापासून पुढे जायला पाहिजे. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो, तेव्हा आम्ही असले प्रश्न विचारत होतो. आम्ही यावर दुसऱ्यांना उपदेश देण्याचा प्रयत्न करत होतो.”

यानंतर आलिया देखील त्यांच्या या उत्तराला होकार दर्शवत म्हणाली की, “लग्नाच्या आधी सेक्स ही गोष्ट आता खूप नॉर्मल आहे. आता या असल्या प्रश्नांची गरज नाहीये आणि आता काळ देखील खूप बदलला आहे.”

आलियाचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोअर हा आता मुंबईमध्ये आला आहे. त्यामुळे तिने त्याच्याबाबत देखील तिच्या वडिलांना प्रश्न विचारला. तिने विचारले की, ते शेनबाबत काय विचार करतात?

अनुरागने उत्तर दिले की, “शेन मला पसंत आहे. मला तुझ्या मित्रांची आणि मुलांची निवड पसंत आहे. शेन खूप चांगला आहे. तो एक आध्यात्मिक आहे. तो खूप शांत आहे. त्याच्यात असे गुण आहेत जे 40 वर्षाच्या पुरुषांमध्ये देखील नसतात.”

यानंतर आलियाने त्याला मुलींना त्यांच्या मित्रांसोबत फिरण्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्याने उत्तर दिले की, “मला असे वाटते की, आई- वडिलांच्या मनात हा प्रश्न त्यांच्या मुलांप्रती असणाऱ्या काळजीमुळे येतो. परंतु आता त्यांना हे समजावण्याची वेळ आली आहे की, ज्या भारतातून ते आले आहेत तो आता तसा राहिला नाही.”

पुढे आलियाने विचारले की, जर ते तेव्हा त्यांच्या मुलीच्या रूममध्ये गेले, जेव्हा तो मेकआउट करत असेल तर?? अनुराग कश्यपने उत्तर दिले की, “मी तिला सॉरी बोलेल आणि तिथून निघून जाईल.” तिने टिनेज मुलीच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीबाबत प्रश्न विचारल्यावर अनुराग म्हणाला की, “मला केवळ तिच्या सुरक्षेची काळजी असेल की, तिला कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही.”

अनुरागने पुढे सांगितले की, “हा केवळ आपल्या मेंदूचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा खेळ आहे. आपण आपल्या मुलांपेक्षाही जास्त दडपणाखाली वाढलो आहोत. आपल्या मुलांना आपल्या पेक्षाही चांगल्या पद्धतीने भावना व्यक्त करता येतात. त्यांना काही वाटलं, तर ते आपल्याशी बोलतील. मला असं वाटतं की, आपल्यासोबत घडलेल्या गोष्टींचा दबाव आपण त्यांच्यावर नाही टाकला पाहिजे.”

अनुराग आणि आलिया हे केवळ एक बाप- लेक नाही, तर एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. हा व्हिडिओ पाहून असे लक्षात येते की, आलिया तिच्या वडिलांसोबत कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी कंफर्टेबल आहे.

अनुराग कश्यप यांनी सेक्स, लग्न यांसारख्या अनेक विषयांवर सामाजिक स्थरावर त्यांचे विचार मांडले आहेत. अनुराग कश्यप हे आधुनिक चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका बिली ईलिशला आशियायी लोकांची खिल्ली उडवणे पडले महागात; पोस्ट शेअर करत मागावी लागली माफी

-जेव्हा बिग बींनी नाईलाजाने बांधली होती शर्टाची गाठ; फॅशन समजून चाहत्यांनीही केली नक्कल, आता सांगितला किस्सा

-‘पाऊस, निसर्ग आणि मी…’, म्हणत चिखलात चालताना दिसली मराठमोळी प्राजक्ता माळी


Leave A Reply

Your email address will not be published.