Monday, July 8, 2024

Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने मागितली वडिलांची परवानगी, ‘असे’ मिळाले उत्तर

बॉबी देओलच्या (Bobby Deol) लोकप्रिय वेब सीरिज ‘आश्रम’मध्ये दिसलेली अभिनेत्री अनुरिता झा (Anuritta Jha) ही बिहारची आहे. अशा परिस्थितीत तिचे कुटुंबीय चित्रपटात काम करण्याबाबत प्रचंड संभ्रमात होते. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये अनुरिता कविताच्या भूमिकेत दिसली होती. त्याचवेळी, अलीकडेच अभिनेत्रीने माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने ‘आश्रम ३’च्या सीनबद्दल कुटुंबाला आधीच सांगितले होते.

अभिनेत्री म्हणाली, “माझ्या करिअरमध्ये अशा प्रकारचा सीन पहिल्यांदाच केला. वडिलांना फोन करून मी म्हणालो, पप्पा मालिकेत असे सीन्स असतील, मी हे करू का? मग ते म्हणाला, बिंदास कर.” (anurita jha asked for permission of intimate scene from her father)

‘आश्रम ३’बद्दल बोलली अभिनेत्री
अनुरिता झा या मुलाखतीत पुढे म्हणाली, “मला शूटिंगमध्ये कोणतीही अडचण आली नाही. प्रकाश झा खूप काळजी घेणारे आहेत. सेटवर फारसे लोक नव्हते. माझे सीन करण्यापूर्वी प्रकाश सरांशी बोलणेही झाले होते. पण हे शूट कसं केलं जातं, हे मला माहीत नव्हतं. मला चुकीचा सीन अजिबात नको होता. मी बिहारची आहे, माझे कुटुंब अतिशय साधे आहे आणि चित्रपटांशी कोणाचाही संबंध नाही. या सगळ्या गोष्टी माझ्या मनात होत्या.”

‘घरच्यांना खूप राग यायचा’
अनुरिताने सांगितले की, तिचे कुटुंब कामासाठी खूप सपोर्टिव्ह आहे. ती म्हणते, “जेव्हा तुमचे कुटुंब सोबत असते, तेव्हा गोष्टी खूप सोप्या होतात. पूर्वी माझे आई-वडील चिडायचे. मुंबईत माझ्या सुरुवातीच्या काळात ते माझ्या सुरक्षिततेसाठी खूप घाबरले होते. पण आता ते सर्व ठीक आहेत.”

अनुरिता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) २०१२ मध्ये आलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा