अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे एक लोकप्रिय जोडपे आहे. नात्यात बरेच चढउतार सहन करून, हे जोडपे आता सुखी संसार करत आहे. त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत सर्व काही बऱ्याच चर्चेत राहिले आहे. खुल्लम खुल्ला प्रेम जाहीर करणाऱ्या या जोडप्याने, लग्न मात्र अतिशय खासगी पद्धतीने केले. विशेष म्हणजे नुकताच १ मे अनुष्काने आपला वाढदिवस साजरा . चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या लग्नाबद्दल काही खास गोष्टी…
View this post on Instagram
इटलीमध्ये पार पडला विवाहसोहळा
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी सन २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनी इटलीमध्ये आपल्या कुटुंबीयांसह आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न उरकून घेतले. अवघ्या काही लोकांमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये कोटींचा खर्च झाला होता.
अनुष्काने परिधान केला होता सब्यसाचीचा लेहंगा
प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की, आपल्या लग्नात ती सर्वात सुंदर दिसावी. यात पण मुलींचा भर असतो तो कपड्यांवर. अनुष्काचे नाव तर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते. अशामध्ये, लग्नाचा लेहंगा हटके असणारच होता. अनुष्काने आपल्या लग्नात सब्यसाचीचा लेहंगा परिधान केला होता.
View this post on Instagram
कमी पाहुण्यांमध्ये पार पडला सोहळा
विरुष्काने आपला विवाहसोहळा अगदी खासगी ठेवला होता. त्यामुळे त्यांनी लग्नात फक्त काही ठराविक लोकांना आमंत्रित केले होते. त्यांच्या लग्नात केवळ कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांची खास मित्रमंडळी उपस्थित होती.
लग्नात झाला होता ५० कोटींचा खर्च
बरेच दिवस डेट केल्यानंतर, विरुष्का लग्नबंधनात अडकले. मात्र, क्वचितच लोकांना माहिती असेल की, विरुष्काच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नात अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. कमी पाहुण्यांमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात तब्बल ५० ते ५५ कोटींचा खर्च झाला होता.
व्हायरल झाले होते फोटो
विरुष्काच्या लग्नात एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने फोटो क्लिक केले होते. हे फोटो बघता बघताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
गोंडस मुलीचे पालक बनले आहेत विरुष्का
याच वर्षी अनुष्का आई बनली आहे. तिने २०२१ सालच्या जानेवारी महिन्यात ११ तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला. जोडप्याने आपल्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस
सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’