Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवीनच आईबाबा झालेल्या प्रियांका आणि निकला अनुष्काने दिल्या स्वतःच्या अनुभवातून प्रेरित शुभेच्छा

नुकतीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी ते आईबाबा झाल्याची गोडबातमी सर्वांना दिली आणि त्यांच्या फॅन्सला खूपच आनंद झाला. त्यांना त्यांच्या या गोड बातमीसाठी त्यांच्या फॅन्सकडून, कलाकारांकडून अमाप शुभेच्छा मिळत आहे. यातच अभिनेत्री अनुष्का शर्माने या नवीनच आईबाबा झाल्या जोडप्याला अतिशय हटके आणि मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत. सरोगसीचा माध्यमातून आईबाबा झाल्यानंतर त्यांनी ही न्यूज जेव्हा जगासमोर आणली तेव्हा सर्वानाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या दोघांना आतापर्यंत खूप शुभेच्छा आल्या असतील मात्र यात सर्वात जास्त लक्ष वेधत आहे अनुष्काने दिलेल्या शुभेच्छा.

अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक नोट शेअर करत प्रियांका आणि निकला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमधून अनुष्काने तिच्या शुभेच्छांमधून स्वतःचा अनुभवावरून या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खूप अभिनंदन प्रियांका चोप्रा आणि निक जोनास. रात्रीची झोप खराब करण्यासाठी आणि एका अद्वितीय आनंदासाठी, प्रेमासाठी तयार व्हा. छोट्या बाळाला खूप प्रेम.” अनुष्काने या शुभेच्छा प्रियंका आणि निक आईबाबा झाल्यानंतर काही दिवसांनी दिल्या आहेत.

Photo Courtesy: Instagram/anushkasharma

एक वर्षभरापूर्वी अनुष्का आणि विराट कोहली एका मुलीचे आईबाबा बनले. नुकतेच त्यांच्या मुलीला वामिकाला एक वर्ष देखील झाले. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीला तिच्या जन्मानंतर मीडियापासून खूप लांब ठेवले. गेल्या वर्षभरात या दोघांनी वामिकाचा चेहरा जगासमोर आणलाच नाही.

प्रियांकाने ही गोड बातमी देताना इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “आम्हाला हे सांगताना खूपच आनंद होत आहे, की आम्ही सरोगसीचा माध्यमातून आईबाबा झालो आहोत आणि आम्ही आमच्या पहिल्या बाळाचे नुकतेच स्वागत केले आहे. तुम्ही सर्वानी आमच्या खासगी आयुष्याचा मान ठेवावा, धन्यवाद.” प्रियांका आणि निकने २०१८ साली राजस्थानमध्ये लग्न केले हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने संपन्न झाले होते. त्यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा :

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्का शर्माचे चमकले नशीब, ‘अशी’ मिळाली किंग खानसोबत काम करण्याची संधी

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

हे देखील वाचा