Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड रस्त्यावरील कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्याला लोकांनी म्हटले वेडे, तर अनुष्का शर्मा म्हणाली, “वेडे तर ते लोकं आहेत जे…’

रस्त्यावरील कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्याला लोकांनी म्हटले वेडे, तर अनुष्का शर्मा म्हणाली, “वेडे तर ते लोकं आहेत जे…’

अनुष्का शर्मा सध्या तिचे मदरहूड एन्जॉय करत असून, चित्रपटांपासून बऱ्यापैकी लांब आहे. असे असूनही अनुष्का तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सतत लाइमलाईट्मधे असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करते सोबतच तिचे काही फोटो, व्हिडिओ देखील शेअर करते. आता पुन्हा एकदा अनुष्का तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून, ज्यामुळे ती मीडियामध्ये आणि इंटरनेटवर गाजत आहे.

अनुष्काने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने दिल्लीमधील त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे, ज्याला लोकांनी वेडा म्हणून हिणवले होते. झाले असे की, दिल्लीमधील एक व्यक्ती एका छोट्या जखमी पपीला हातात घेऊन त्याला कुरवाळत होता. हे पाहून त्याला पाहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी त्यावर मजा करत त्याला वेडा म्हणायला सुरुवात केली. यावर उत्तर देताना त्या व्यक्तीने मुक्या जनावरांना मदत करा असे सांगितले. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. हाच व्हिडिओ अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवत पोस्ट करत त्या व्यक्तीचे भरभरून कौतुक केले.

anushka sharma
Photo Courtesy Instagramanushkasharma

अनुष्काने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “वेडे तर ते आहेत ज्यांना माणुसकी समजत नाही. तू तर…” यासोबतच तिने शाबासकी आणि टाळ्या वाजवणारे ईमोजी पोस्ट केले आहेत. हा व्हिडिओ पाहून कदाचित तो जुन्या दिल्लीतील असल्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये आजूबाजूचे लोकं त्या व्यक्तीवर मजा घेताना दिसत आहे.

अनुष्काचा भूतदयेवर खूपच विश्वास आहे. ती नेहमीच प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर प्रेम करताना दिसते. याशिवाय मुक्या जनावरांवर उपचार करण्याचे देखील सांगत असते. २०२०मध्ये तिने जनावरांवर होणाऱ्या हिंसेविरोधात सक्त कायदा यावा यासाठी समर्थन करताना दिसली होती. यासाठी तिने ‘जस्टिस फॉर एनिमल’ हा हॅशटॅग वापरून एक डिजिटल मोहीम देखील चालू केली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा