Friday, April 19, 2024

लॉटरीची तिकीटं विकून अनु कपूर यांनी कुटुंबाला लावलाय हातभार, जाणून घ्या त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास

अभिनेते अनु कपूर हे त्यांच्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती आहे. जीवनात आलेल्या अडचणींना तोंड देत, ज्यांनी यश प्राप्त केले. ते म्हणजे अनु मलिक. एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते, गायक, रेडिओ जॉकी, टिव्ही होस्ट अशा वेगवेगळ्या रूपातून त्यांनी त्यांचे टॅलेंट जगाला दाखवले आहे. त्यांनी १०० पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. परंतु त्यांनी ‘अंताक्षरी’ने खास ओळख दिली. अशातच रविवारी (२० फेब्रुवारी) ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे यानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी.

अनु कपूर (anu kapoor) यांचा जन्म २० फेब्रुवारी १९६५ मध्ये भोपाळ येथे झाला. अनु कपूर यांचे वडील मदललाल कपूर एक पारसी थिएटर कंपनी चालवत होते. त्यांची आई एक शिक्षिका होती. अनु यांना तीन भाऊ आणि एक बहिण आहे. त्यांनी लहान असताना खूप गरिबीत दिवस काढले आहेत. त्यांचे खरे नाव अनिल कपूर हे होते, परंतु अभिनेता अनिल कपूर यांच्यामुळे त्यांनी त्यांचे नाव बदलून अनु कपूर असे ठेवले. त्याच्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून सुरुवातीच्या दिवसात ते चहा विकत होते. तसेच लॉटरी तिकीट देखील विकत होते. त्यांनी दिल्ली च नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये एडमिशन घेतले आणि तिथूनच अभिनय शिकला. (Anu kaporo celebrate his birthday, let’s know about his personal life)

अनु कपूर जेव्हा एनएसडीमध्ये होते. त्या वेळी एका नाटकात त्यांनी खूप छान अभिनय केला होता. त्यावेळी निर्माते श्याम बेनेगल यांना त्यांचा अभिनय खूप आवडला होता. त्यावेळी २३ वर्षाच्या अनु यांनी ७० वर्षाच्या व्यक्तीचा अभिनय केला होता. श्याम यांना त्यांचा अभिनय एवढा आवडला की, त्यांनी अनु यांना ‘मंडी’ या चित्रपटात काम दिले. यानंतर अनु यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. परंतु ‘अंताक्षरी’ने त्यांना खरी ओळख दिली. अनु यांनी या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते.

अनु कपूर हे एक उत्तम गायक देखील होते. हिंदी सोबतच बाकी अनेक भाषा त्यांना येत होत्या. जेव्हा ते बोलतात तेव्हा समोरचा केवळ ऐकत बसतो. त्यांनी टिव्ही वरील अंतांक्षरी हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली. यानंतर ते खूप लोकप्रिय झाले. ते जेव्हा बोलतात तेव्हा श्रोते अगदी मंत्रमुग्ध होतात.

अनु कपूर यांचे वैयक्तिक आयुष्यात अनेक ट्विस्ट आले आहे. त्यांनी दोन वेळा लग्न केले आहे. तसेच त्यांना चार मुलं आहेत. माध्यमातील वृत्तानुसार तेव्हा त्यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. तेव्हा त्यांनी दुसऱ्या पत्नीशी विवाह केला. दुसऱ्या पत्नीशी ही घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पहिल्या पत्नीशी विवाह केला.

हेही वाचा :

हे देखील वाचा