×

केवळ किस करण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने महेश मांजरेकरांना पाच वेळेस हात धुवायला भाग पाडले!

अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) ही नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ‘ए थर्सडे’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नेहा धुपिया, यामी गौतम (Yami Gautam), अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) हे दिसणार आहेत. शोमध्ये कपिल शर्माने (Kapil Sharma) नेहाचा एक किस्सा सांगितला. त्यामध्ये समजले की, तिने किस करण्याच्या आधी सहकलाकाराला तब्बल पाच वेळेस हात धुण्यास सांगितले होते. 
शोच्या प्रोमोमध्ये यामी आणि नेहा काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. नेहा ही तिच्या स्वच्छतेची खास काळजी घेते. कपिलने खुलासा केला की, ‘दस कहानीयां’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान तिने महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) चक्क पाच वेळेस हात धुण्यास सांगितले होते. त्याच वेळेस कपिलच्या बोलण्याची खिल्ली उडवताना ती म्हणते की, “मी आता विवाहित आहे आणि अशी भूमिका अजिबात साकारु शकत नाही.”
कपिलने तिची खिल्ली उडवत म्हटले की, “तुम्ही पाणीपुरी वाल्याला हात धुवायला किंवा अंघोळ सांगता का?” नेहा धुपियाच्या ‘ए थर्सडे’ चित्रपटाची कथा अपहरणावर आधारित आहे. यामध्ये यामी गौतम एका मुलाचे अपहरण करते आणि ६ कोटीची खंडणी मागते अशी कथा दाखवली आहे. नेहा धुपियाने लग्न केल्यापासून चित्रपटक्षेत्रात काम करणे कमी केले आहे.

हेही वाचा-

Latest Post