क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही कोरोना काळात उचलणार खारीचा वाटा, सोशल मीडियावर दिली माहिती

Anushka Sharma share a video on Instagram that she and virat kohli will help to corona patients


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू खूप वेगाने संक्रमण करत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या लाखोंमध्ये वाढत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देत आहेत. तरीही नागरिकांनी सगळ्या सूचनांचे पालन न केल्याने आता महाराष्ट्र सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी पर्यायाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रुग्णांना वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जात आहे. सरकारसोबत अनेकजण देशाला या संकटातून वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली हे देखील कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. याची माहिती स्वतः‌‌ अनुष्का शर्माने एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे.

अनुष्का शर्माने शेअर केलेल्या या व्हिडिओमधून चाहत्यांना एक बातमी दिली आहे. तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की,”सर्वांना नमस्कार! मी अशी आशा करते की, तुम्ही सगळे सुरक्षित असाल. तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी खरंच माझा वाढदिवस खूप खास बनवला आहे. परंतु या कठीण काळात माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाहीये. परंतु तुम्ही सर्वांनी पाठवलेले मेसेज मी पाहिले आहेत.”

अनुष्काने पुढे सांगितले की, “तुम्हा सर्वांसाठी मी एक खास मेसेज घेऊन आले आहे. आपल्या देशावर आलेल्या या संकटात तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन देशाला आधार द्या, अशी माझी विनंती आहे. देशाच्या या कठीण दिवसात मी आणि विराट देखील मदत करणार आहोत. याची माहिती लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला देखील या उपक्रमात सामील होता येईल. लक्षात ठेवा या संकटाचा सामना आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. मित्रांनो सुरक्षित रहा आणि तुमची काळजी घ्या.”

अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती याआधी शेवटची शाहरुख खान सोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या दिवसात तो दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल याचा पहिल्या ‘काला’ या चित्रपटाची निर्माती आहे. जो चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोहा फतेहीकडून चाहत्यांना डान्सचे धडे; पाहा धमाकेदार स्टेप्स

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.