‘दिलबर गर्ल’ नोहा फतेहीकडून चाहत्यांना डान्सचे धडे; पाहा धमाकेदार स्टेप्स


बॉलिवूडची ‘डान्स क्वीन’ म्हणून नोरा फतेहीची खास ओळख आहे. नोरा फतेही तिच्या डान्ससोबतच तिच्या आकर्षक अंदाजासाठी खूप प्रसिद्ध आहे. नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने आपल्या डान्स, आणि स्टाईलने सर्वांना वेड लावले आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोराची शैली कौतुकास्पद आहे. व्हिडिओमध्ये ती चाहत्यांना डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे.

नोरा फतेहीच्या डान्सने चाहत्यांना वेड लागले आहे. चाहत्यांना नोरा फतेहीकडून तिच्या डान्स स्टेप शिकण्यास फार आवडते. गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही, तिच्या डान्सच्या सरावाचे व्हिडिओ देखील शेअर करत आहे. नोराच्या या डान्स सरावाच्या व्हिडिओची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कायम वाट बघत असतात. त्याच वेळी, जी गाणी आता जास्त प्रचलित आहेत, त्यावर नोराने डान्सच्या स्टेप शेअर केल्या आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आजकाल इंस्टाग्रामवर सर्वाधिक बघितले जाणारे कार्डी बीचे गाणे बिग बाग बुसेनची जोरदार चर्चा आहे. कलाकारही या गाण्यावर खूप थिरकताना दिसत आहेत.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटात दिसणार आहे. नोराने आपल्या शैलीने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. चाहत्यांना आशा आहे की, या चित्रपटात नोराचा दणका नृत्य दिसेल.

नोरा काही दिवसांपूर्वी तिच्या, दिलबर दिलबर गाण्यावर माधुरी दीक्षित हिच्यासोबत नाचताना दिसली होती. चाहत्यांना तो व्हिडिओ खूप आवडला होता. नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर दिलबर गाण्याच्या आयटम साँगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच आता बघता बघता तिने आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करून टाकले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


Leave A Reply

Your email address will not be published.