बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने सध्या चित्रपटातून ब्रेक घेतला आहे. मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनुष्का सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. आता नुकताच अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे. यात तिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे, ज्यामध्ये तिने दिलेली स्माईल चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडत आहे.
हा फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले, “सूर्य चमकत होता, वातावरण आल्हाददायक होते, पोज करण्याचे मन… गाण्याची पुढची ओळ विसरले.” अनुष्काचे हे गोंडस फोटो पाहून, चाहते प्रेम व्यक्त करत आहेत, तर तिचा पती विराट कसा मागे राहील! विराट कोहलीने अनुष्काच्या या फोटोवर तीन हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. हा फोटो इतर कोणी नाही तर विराटने स्वतः क्लिक केला आहे आणि चाहते त्याच्या फोटोग्राफीच्या कौशल्याने प्रभावित झाले आहेत. तसेच फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले, “या हसण्याला नजर लागू नये.” तर एकाने तिला ‘सनशाईन’ म्हटले. अनुष्काच्या या फोटोवर चाहते प्रेम तर व्यक्त करतच आहेत आणि सोबत विराटच्या फोटोग्राफी कौशल्याचे कौतुकही करत आहेत. (anushka sharma share sun kissed photo virat kohli react love fans are showring love)
बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ रोजी, इटलीच्या टस्कनी येथील आलिशान रिसॉर्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत गुप्तपणे लग्न केले. तर ११ जानेवारी २०२१ रोजी विराट आणि अनुष्का एका गोंडस मुलीचे पालक बनले आहेत. विराट-अनुष्काने त्यांचा मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा
-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर