‘मी जशी आहे तशी मला आवडते,’ अभिनेत्री अन्विता फलटणकरने मुलाखतीत केला खुलासा


“मम्मीची एक फाईट आणि वातावरण टाईट” हा डायलॉग आठवतोय ना ??? आठवणारच !! 2019 मधील गर्ल्स चित्रपटातील या डायलॉगने सर्वांना वेड लावले होते. यासोबत वेड लावले या चित्रपटातील मती, मॅगी आणि रुमीने. यातील बिनधास्त, बेधडक आणि वेळ आल्यावर डायरेक्ट हातापायीवर येणारी रुमी म्हणजे अन्विता फलटणकर. याच चित्रपटातून एक गुबगुबीत, क्यूट अभिनेत्री सर्वांसमोर आली. इथूनच अन्विताच्या करिअरचा खरा प्रवास सुरू झाला.

हो! अगदी बरोबर ओळखलंत, अन्विता म्हणजे ‘येऊ कशी तशी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतील आपली सर्वांची लाडकी स्वीटू. खरंतर आजकाल सौंदर्याच्या व्याख्या खूप बदलल्या आहेत. गोरा रंग, सडपात्तळ बांधा या खऱ्या सौंदर्याच्या खुणा मानल्या जातात. पण वर्षानूवर्षा पासून चालत आलेल्या या व्याख्यांना डावलून येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने सौंदर्याची एक नवीन व्याख्या समोर आणली आहे. खरंतर अन्विता जाड असल्याने तिला अनेक वेळा तिच्या तब्बेतीवरून ट्रोल केले होते. पण एका ऑनलाईन मुलाखतीत ती कशी सुंदर आहे याचा तिने खुलासा केला आहे.

लोकसत्ता डिजिटल अड्ड्यावर अन्विताला जेव्हा मालिकांच्या या बदलत्या ट्रेंडबद्दल विचारले होते तेव्हा तिने यावर सांगितले की,”जाड असणाऱ्या मुली लहानपणापासूनच या गोष्टीचा सामना करतात. त्यांना देखील वाटते की, आपल्याला कुणीतरी सुंदर म्हणावे. पण आपल्याला वाटतं आपण सुंदर नाही. कारण आपण गुटगुटित आहोत. मुळात आपण कसेही असू आपण ते मान्य केले पाहिजे. जाड, बारीक, काळे, गोरे जसे आहोत तसे. आरश्यात बघताना प्रत्येक मुलाला असचं वाटलं पाहिजे की, मी खूप सुंदर आहे. मी जशी आहे तशी खूप छान आहे आणि मला मी आवडते याची जाणीव झाली पाहिजे. मला आनंद आहे की, आता सर्वांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. म्हणूनच अशा वेगळ्या मालिकेला प्रेक्षकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.”

यावेळी मालिकेतील ओम म्हणजेच शाल्वने देखील सुंदरतेवर भाष्य केले. तो म्हणाला की,”पूर्वी पासूनच सुंदरतेची व्याख्या खूप चुकीची सांगण्यात आली आहे. त्यामुळे सुंदर म्हणजे तेचं अस आपल्या मनात रुजलं आहे. पण अलीकडील काळात यात प्रचंड बदल घडतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे.”


Leave A Reply

Your email address will not be published.