भारतीय प्रेक्षक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण'(Ramayan) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. आता चिनी वापरकर्ते या ट्रेलरचे कौतुक करत आहेत.
चीनमध्ये ‘रामायण’ ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रचंड उत्साह निर्माण झाला. या ट्रेलरला अवघ्या काही तासांतच दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. चिनी वापरकर्त्यांनीही कमेंट्स करून चित्रपटाच्या निर्मितीचे आणि तो चिनी चित्रपटांपेक्षा सरस असल्याचे कौतुक केले.
चीनमध्ये ‘रामायण’ ट्रेलरवरील प्रतिक्रिया आश्चर्यापासून ते आनंदापर्यंत विविध होत्या. कमेंट्स विभागात वापरकर्त्यांनी चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्सची तुलना चिनी चित्रपटांशी केली.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग या दिवाळीत जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे आणि यश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा
मुकेश खन्ना यांचा ‘वंदे मातरम’ला पाठिंबा, पण ‘जन गण मन’ला आक्षेप घेऊन केली चूक










