सध्याच्या काळात सर्वात चर्चित असणाऱ्या मालिकांपैकीच एक आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. ही मालिका पाहायला प्रेक्षक दररोज आवर्जून टीव्हीसमोर बसतात. यातील कलाकारांचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ‘ओम’ आणि ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. गोड गोंडस अशी स्वीटू आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा ओम, हे दोघे चाहत्यांच्या मनावर गारुड घालून आहेत.
या जोडीचे रोमँटिक फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या फॅन पेजवरून हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. तर कधीकधी स्वीटू अर्थातच अन्विता देखील त्यांचे फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने त्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत, ज्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, स्वीटूच्या मागे ओम आहे आणि तो तिला काहीतरी बोलत आहे. तर त्याचे बोलणे ऐकून स्वीटू प्रेमाने लाजत आहे. यातील तिचा लाजरा चेहरा अगदी बघण्यासारखा आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (anvita phaltankar shared her romantic photo with shalva see how fans reacted)
ओम आणि स्वीटूचा हा रोमँटिक फोटो सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करत अन्विताने कॅप्शनमध्ये ‘जाने क्या बात है’ असं लिहिलं आहे. सोबतच तिने लाल हार्ट ईमोजी देखील बनवला आहे. चाहते कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. शिवाय या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे का? असंही कमेंटमध्ये बोललं जात आहे.
अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-