भारती झालीय म्हातारी! तरीही हर्ष म्हणतोय, ‘प्रेम तर नेहमी तरुणच असते…’; व्हिडिओवर उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे टेलिव्हिजनवरील एक अत्यंत रोमँटिक जोडपे आहे. त्यांची केमिस्ट्री आपल्याला टेलिव्हिजनवर तसेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून समजतच असते. त्यांच्यातील प्रेम, रुसवे-फुगवे, भांडण या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडतात. तसेच त्या दोघांमधील बाॅंडिंग देखील खूप चांगली आहे. अशातच या लव्ह बर्ड्सचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. ( Bharati singh and harsh Limbachiya’s comedy video viral on social media)

हर्ष लिंबाचियाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला भारती म्हातारीच्या रुपात दिसत आहे. हर्षने तसा फिल्टर वापरला आहे. भारती हातात मोबाईल घेऊन काहीतरी करताना दिसत आहे. तितक्यात हर्ष तिथे जातो आणि म्हणतो की, “ती म्हतारी झाली होती, पण मोबाईलची सवय तिला आज देखील होती.” हे ऐकून भारती देखील एका म्हातारीप्रमाणे खोकण्याचा अभिनय करते. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “प्रेम तर नेहमी तरुण राहते, पत्नीच म्हातारी होते.”

हर्ष आणि भारतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सगळेजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. खास म्हणजे भारतीने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. तिने रागाची ईमोजी पोस्ट करून लिहिले आहे की, “आता बघ बेटा.” त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

भारती आणि हर्ष सध्या ‘डान्स दीवाने’ हा रियॅलिटी शो होस्ट करत आहेत. या आधी देखील त्यांनी अनेक शो होस्ट केले आहेत. त्यात त्यांचा ‘खतरा खतरा खतरा’ हा शो खूप लोकप्रिय होता. भारती ही ‘द : कपिल शर्मा’ मध्ये काम करत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.