वयाच्या २३व्या वर्षी तुटलं होतं कृष्णा श्रॉफचं हृदय; टायगर श्रॉफच्या बहिणीला आली पहिल्या प्रेमाची आठवण


बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ ही तिच्या भावाप्रमाणे फिटनेसमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिने नुकतेच तिचा म्युझिक व्हिडिओ ‘किन्नी किन्नी वारी’ मधून पदार्पण केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी ती तिच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत होती. अशातच तिने तिच्या एका मुलाखतीत तिच्या पहिल्या प्रेमाबाबत खुलासा केला आहे. (Krishna Shroff talks about her first love and break up)

एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले की, २० वर्षाची असताना तिला पहिले प्रेम झाले होते. तिने सांगितले की, “आम्ही तीन वर्ष एकत्र होतो. आमचे खूप सिरियस रिलेशनशिप होते. आम्ही एकत्र राहिलो, एकत्र फिरलो, संपूर्ण जग एकत्र पाहिलं आणि एकत्र काम देखील केलं आहे. नंतर आमचं ब्रेकअप झालं.” तिने सांगितले की, “तो एवढा पण वाईट नव्हता. आम्ही दोघे सहमताने वेगळे झालो आहोत. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा माझे हृदय खूप वाईट पद्धतीने तुटले होते. परंतु त्यातून मी खूप प्रेरित झाले आणि माझी सगळी एनर्जी फिटनेसवर लावली. त्यानंतर मला कोणीही थांबवू शकले नाही. मी त्या अनुभवासाठी खूप आभारी आहे.”

कृष्णाने पुढे सांगितले की, “या म्युझिक व्हिडिओचा अर्थ असा नाही की, मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण मला यातील कॉन्सेप्ट आणि मेसेज खूप आवडला होता. मला असं काहीतरी करायचं आहे, ज्यात स्पार्क आहे. ते मला बॉलिवूडमध्ये दिसत नाही. बॉलिवूडशिवाय देखील इथे करायला अनेक गोष्टी आहेत.”

‘किन्नी किन्नी वारी’ या गाण्यात तिच्यासोबत जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर, जन्नत जूबैर, राज शोकर आणि तन्वी दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.