Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रणवीरपूर्वी चार पैशांसाठी ‘या’ कलाकारांनी सोडलेली लाज, जगासमोर झालेले उघडे; यादीतील नावे खळबळ माजवणारी

बॉलिवूड सिनेमे असो किंवा मासिके, सीन आणि कव्हर पेजची मागणी स्टार्सना काहीही करायला भाग पाडते. रणवीर सिंगचा असाच एक फोटो पाहून लोक हे म्हणत आहेत. रणवीर सिंग याने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे व त्यात तो कपड्यांविना दिसत आहे. या फोटोंमध्ये तो अतिशय आत्मविश्वासू आणि बोल्ड दिसत आहे. फोटोत दिसत असल्याप्रमाणे कपड्यांशिवाय कॅमेऱ्याला सामोरे जाण्यास त्याला अजिबात समस्या किंवा भीती वाटत नाहीये. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर अतिशय वेगाने व्हायरल होत आहेत. परंतु, असं कपड्यांविना कॅमेऱ्यासमोर येणारा रणवीर हा काही पहिलाच अभिनेता नव्हे. या आधीही, बरेच अभिनेते असे केल्याने चर्चेत आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही अभिनेत्यांबद्दल.

मिलिंद सोमन (Milind Soman)
या यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे मिलिंद सोमणच, ज्याने एका ऍड शूटसाठी आपले सगळे कपडे काढले होते. मिलिंदचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते आणि यानंतर त्यांना भरपूर प्रसिद्धीही मिळाली होती. या फोटोशूटमध्ये चर्चित मॉडल मधु सप्रे (Madhu Sapre) ही देखील मिलिंदसोबत बिना कपड्यांचं दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

आमिर खान (Aamir Khan)
आमिर खानने ‘पीके’ (PK) या सिनेमातील एका शॉटसाठी आपले कपडे काढले होते. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये देखील, तो बिना कपड्यांचा दिसला होता. मात्र, नंतर गोंधळ झाल्यावर हे पोस्टर बदलण्यात आलं.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor)
अभिनेता रणबीर कपूर याने देखील त्याचा सिनेमा ‘संजू’ (Sanju) या मधील एका सीनसाठी, त्याचे पूर्ण कपडे काढले होते. हा सीन तेव्हाचा आहे, जेव्हा त्याला जेलमध्ये जावं लागतंं. परंतु ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा रणबीरने कॅमेऱ्या समोर कपडे काढले आहेत. याआधीही, त्याने असेच काही ‘सांवरिया’ (Saawariyan) या चित्रपटात केलं होतं. खास म्हणजे या सिनेमातूनच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

जॉन अब्राहम (John Abraham)
‘न्यूयॉर्क’ (Newyork) चित्रपटातील जॉन अब्राहमच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती. या चित्रपटात जॉनने एका निरपराध भारतीयाची भूमिका साकारली आहे, ज्याला पोलिसांनी खोट्या आरोपांच्या आधारे अटक केली होती. या चित्रपटात जॉन अब्राहम जेलच्या सीनमध्ये कपड्यांविना दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

नील नितिन मुकेश (Neil Nitin Mukesh)
नील नितीन मुकेशने ‘जेल’ (Jail) या चित्रपटात एक शॉट दिला होता ज्यामध्ये, तो कपड्यांशिवाय दिसत होता. नीलच्या या सीनने चाहत्यांना खूप आश्चर्यचकित केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh)

टायगर श्रॉफ (Tiger Shroff)
या यादीतील शेवटचं नाव आहे ‘हिरोपंती’ (Heropanti) या चित्रपटातून पदार्पण केलेल्या टायगर श्रॉफ याचं आहे.

टायगर ‘बागी २’ (Baghi 2) मधील तुरुंगातील दृश्यादरम्यान कपड्यांशिवाय दिसला होता. या सीनमध्ये पोलीस टायगर श्रॉफला मारहाण करताना दिसत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

गजबच! १५ मिनिटात लग्न आणि ४ तासात मेहंदी, ‘असा’ घाईघाईत पार पडलेला ‘अनुपमा’चा लग्नसोहळा

नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, १२० सिनेमांना दिलंय संगीत

वडील अभिनेते असूनही सूर्याने केले कापड गिरणीत काम, स्वत:च्या हिमतीवर बनवली वेगळी ओळख, आज आहे सुपरस्टार

हे देखील वाचा