Sunday, April 14, 2024

अनिल कपूरच्या अफेअरची ‘धक धक’ समजताच बायकोने तडक गाठला होता चित्रपटाचा सेट

आज बॉलिवूडच्या झक्कास अभिनेत्याचा म्हणजेच अनिल कपूरचा 65 वा वाढदिवस आहे. 65 व्या वर्षी देखील 25 वर्षाच्या व्यक्तीएवढी एनर्जी आणि फिटनेस अनिलला इतर कलाकारांपासून वेगळे बनवते. 24 डिसेंबर 1959 ला मुंबईमध्ये अनिलचा जन्म झाला. 1979 मध्ये उमेश मेहरा यांच्या ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात सहायक अभिनेत्याची भूमिका साकारत अनिलने त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

त्यानंतर चार वर्ष अनिलने अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या. त्यानंतर मात्र 1983 मध्ये ‘ओ सात दिन’ चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. मग त्यांनी कधीही मागे वळून पहिले नाही. मशाल, मेरी जंग, कर्मा, मिस्टर इंडिया, तेज़ाब, राम लखन या चित्रपटांनी अनिलला स्टारडम मिळवून दिले.

अनिलने त्यांच्या कारकिर्दीत जवळपास सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. परंतु माधुरी आणि अनिल ही जोडी त्यावेळी विशेष गाजली. अनिल आणि माधुरीने पहिल्यांदा ‘तेजाब’ या चित्रपटात सोबत काम केले. त्यानंतर त्यांनी रामलखन, बेटा, पुकार, किशन कन्हैया, परिंदा आदी सिनेमात काम केले. असे बोलले जाते की एवढ्या चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे माधुरी आणि अनिल हे एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यावेळच्या काही मीडिया रिपोर्ट्स नुसार त्यावेळी अनिल आणि माधुरी यांच्या अफेयरच्या चर्चांनी वृत्तपत्रात रकाने भरून बातम्या यायच्या.

जेव्हा हे सर्व घडत होते तेव्हा अनिल हे विवाहित होते. सुनीता म्हणजेच अनिल कपूर यांची पत्नी तिला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा ती त्यांच्या तीन मुलांना घेऊन अचानक अनिल आणि माधुरी यांच्या एका चित्रपटाच्या सेटवर पोहचली. सुनीता, अनिल आणि त्यांची मूलं यांना एकत्र एकदम खुश माधुरीने पहिल्यांदाच बघितले. तेव्हा तिला जाणवले की, हे सर्व एकमेकांसोबत खूप आनंदित आहे, एकमेकांवर खूप प्रेम करतात तेव्हाच तिने ठरवले की अनिल आणि सुनीता यांच्या संसारात यायचे नाही. त्यामुळे तिने अनिलपासून अंतर ठेवायला सुरुवात केली.

अनिलने 1984 मधेच सुनितासोबत लग्न केले होते. तर 1999 साली माधुरीने देखील डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर 17 वर्षांनी अनिल आणि माधुरी ‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले होते.
अनिल कपूर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 6 वेळा फिल्मफेयर पुरस्कार आणि 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अशा या झक्कास अभिनेत्याला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.(april 20201 anil kapoor birthday know about his and madhuri dixit affair news)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अनिल कपूर यांना आवडली नव्हती ‘जुदाई’ची स्क्रिप्ट, 25 वर्षांनंतर सांगितले चित्रपट करण्याचे कारण

सुरुवातीला राज कपूरांच्या गॅरेजमध्ये काढले दिवस, गर्लफ्रेंड असतानाही सुनीता उचलायची अनिल कपूरचा संपूर्ण खर्च

हे देखील वाचा