Saturday, June 29, 2024

भाऊ सोपं नाही ‘पंकज त्रिपाठी’ होणं, कधीकाळी स्टूडियोतून धक्के मारून हाकललं होतं.! वाचा कलावंताची संघर्षगाथा

एक दिग्गज कलाकार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मुंबई गाठतात. अनेकांना त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी कठीण प्रसंगांना, अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यानंतरच ते आपले विश्व निर्माण करतात. मात्र, आज आपण ज्या कलाकाराची संघर्ष कहाणी पाहणार आहोत, ती वाचून तुम्ही तुमच्या ध्येयासाठी अक्षरशः पेटून उठाल.

या कलाकाराने बॉलिवूडमध्ये स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. ‘पंकज त्रिपाठी’ असे या दिग्गज कलावंताचे नाव. अभिनेता बनण्यायचे स्वप्न पूर्ण कण्यासाठी ते देखील घर सोडून मुंबईला आले होते. ते जेव्हा घर सोडून आले तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. पण, खूप सारा आत्मविश्वास घेऊन ते मुंबईला आले होते.

मुंबईला आल्यानंतर पंकज यांनी खूप मेहनत केली. त्यांना अनेक प्रोजेक्टमध्ये काम करण्यास नकार देखील मिळाला. परंतु जिद्द ना हारता ते शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले. अनेक वेळा तर त्यांना स्टुडिओमधून धक्के देऊन हकलण्यात आले. जवळ पास 8 वर्ष त्यांनी हे कठोर परिश्रम केले आणि आता जाऊन कुठे ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.

मागील काही वर्षापासून पंकज त्रिपाठी हे नाव त्या कलाकारांपैकी एक आहे ज्याचं नाव चित्रपट सृष्टीत अत्यंत आदराने घेतले जाते. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजने त्यांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिलं. परंतु याआधी त्यांनी काय आणि किती परिश्रम घेतले होते हे त्यांनी खुद्द त्यांच्या तोंडून सांगितले आहे.

पंकज त्रिपाठी सांगतात की,” मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलो होता तेव्हा माझ्याकडे जास्त पैसे नव्हते पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि आत्मविश्वास मात्र खूप होता.” आणि यांचं धाडसाच्या जोरावर त्यांनी एवढ यश मिळवलं आहे. हे यश त्यांना लगेच नाही मिळालं. त्यासाठी त्यांना 8 वर्ष मेहनत करावी लागली. अनेक वेळा तर त्यांना धक्के मारून देखील हकळण्यात आले.तरीही त्यांनी संघर्ष करून आपले स्वप्न पूर्ण केले.

याच इंटरव्ह्यूमध्ये त्रिपाठी असे सांगतात की,”ते आयुष्याकडून खूप प्रेरणा घेतात.” याच कारणामुळे त्यांनी निभावलेलं प्रत्येक पात्र प्रत्येकाच्या मनात घर बनवत. ‘फुकरे’ या चित्रपटातील त्यांचं पात्र प्रेक्षकांना इतके आवडले की, या चित्रपटाचा दुसरा भाग देखील काढला गेला. आणि यानंतर त्यांच्या आयुष्यात भरभराट होत गेली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

हे देखील वाचा