Wednesday, July 3, 2024

‘चंद्रकांता’ मालिकेतील आपल्या भूमिकेने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते ‘शाहबाज खान’, आमिर खानसोबतही केलंय काम

नव्वदच्या दशकात प्रेक्षकांमध्ये टेलिव्हिजनची एक वेगळीच आवड होती. चित्रपटांपेक्षाही सगळ्यांना टेलिव्हिजनवरील मालिका बघायला जास्त आवडायच्या आणि आताही आवडतात. याच दशकात ‘चंद्रकांता’ नावाच्या मालिकेची सगळ्या प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ होती. या मालिकेमध्ये ‘कुंवर विक्रम सिंग’ हे पात्र निभावून लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजेच ‘शाहबाझ खान.’ त्यांनी टीव्ही मालिकेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास अत्यंत मेहनतीने केला. सोबतच पैसा आणि नाव देखील कमावले. शाहबाज यांनी बुधवारी (10 मार्च) आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

शाहबाज यांचा जन्म 10 मार्च 1966 मध्ये मध्यप्रदेश येथे झाला. शाहबाज हे एक उत्कृष्ट कलाकार आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका निभावली आहे. शाहबाज यांच्या बाबतीत ही गोष्ट खूप कमी प्रेक्षकांना माहित असेल की, ते प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद ‘आमिर खान’ यांचे सुपुत्र आहेत.

त्यांनी ‘चंद्रकांता’, ‘द ग्रेट मराठा’, ‘टिपू सुलतान’, ‘युग’, ‘महाराजा रणजित सिंग’ या टीव्ही मालिकेमध्ये काम केले आहे. सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांनी केवळ हिंदीमध्ये नव्हे, तर पंजाबी, गुजराती, कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर छेडाछेड केल्याचा आरोप लागला होता. यावेळी हाती आलेल्या माहितीनुसार शाहबाज यांच्याविरुद्ध एका तरुण मुलीसोबत छेडछाड करण्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा शोध मुंबई पोलीस घेत होते.

त्यांनी ‘नाचनेवाला गानेवाले’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आतापर्यंत ‘मंगल पांडे: द रायझिंग’, ‘बिग ब्रदर’, ‘एजंट विनोद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सनी देओलच्या ‘त्या’ एका चुकीमुळे वडील धर्मेंद्र यांना बसला होता कोट्यवधींचा फटका! वाचा तो किस्सा

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-भारतीय माजी क्रिकेटर रवी शास्त्रींसोबत अफेयरच्या चर्चा, नऊ वर्षांच्या करियरमध्ये तीस सिनेमांना नकार, तरीही अभिनेत्रीने घातली यशाला गवसणी

हे देखील वाचा