Saturday, July 27, 2024

सांगलीची राजघराण्यातील कन्या असलेल्या भाग्यश्रीच्या लग्नाला उपस्थित होते सलमानसह केवळ चार लोक

आज म्हणजेच गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारील)ला सर्वांच्या लाडक्या सुमनचा म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्रीचा 53वा वाढदिवस आहे. आपल्या पहिल्याच सिनेमातून जबरदस्त लोकप्रिय आणि यश मिळवणाऱ्या भाग्यश्रीने एका सिनेमानंतर लगेचच अभिनयाला राम राम ठोकला. तिने तिच्या पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप सोडली की आजही तिला सुमन म्हणूनच ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने एकाच सिनेमातून प्रेक्षकांच्या मानत स्थान निर्माण केले.

असे खूपच कमी अभिनेत्रीबाबत घडते, की त्यांना एकमेव सिनेमातून अद्वितीय असे यश आणि अमाप लोकप्रियता मिळते. याच मोजक्या अभिनेत्रींमध्ये भाग्यश्रीची देखील गिनती केली जाते. सुरज बडजात्या यांच्या मैने प्यार किया या सिनेमातून तिने तिच्या छोट्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर भाग्यश्रीने वयाच्या 19 व्या वर्षी लग्न करत चित्रपटांना अलविदा म्हटले.

भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 ला महाराष्ट्रातल्या सांगली शहरात एका राजघराण्यात झाला. भाग्यश्रीचे वडील श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन हे होते. तिचे संपूर्ण नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राज पटवर्धन असे आहे. भाग्यश्रीने तिच्या अभिनयाची सुरुवात अमोल पालेकरांनी निर्मिती असणाऱ्या, दूरदर्शनवरील ‘कच्ची धूप’ मालिकेतून केली. पुढे तिला मोठा ब्रेक मिळाला आणि ती राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली.

या सिनेमातील तिने रंगवलेली साधी, सोज्वळ, सुंदर सुमनही आजही प्रेक्षकांना वेड लावून जाते. पहिलाच सिनेमा राजश्री सारख्याच मोठ्या निर्मिती संस्थेचा असल्याने ती खूप खुश होती. राजघराण्याची संबंध असल्याने तिच्या वडिलांनी तिला या सिनेमात काम करताना अनेक अटी घालून मगच होकार दिला होता. जसे की, सिनेमात छोटे कपडे घालायचे नाही, बोल्ड सीन्स करायचे नाही आदी. या सर्व अटी कबूल केल्यानंतर भाग्यश्रीने सिनेमा साइन केला.

हा सिनेमा करताना भाग्यश्री, सलमान आणि दिग्दर्शक सुरज बडजात्या तिघेही नवीन होते. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा, कोणालाच वाटले नव्हते की, एवढे यश मिळेल. मात्र प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड प्रेम दिले. सिनेमासोबतच सिनेमातील गाणी आणि भाग्यश्री, सलमानची जोडी देखील सुपरहिट झाली.

या सिनेमानंतर भाग्यश्री खूपच जास्त लोकप्रिय झाली. सलमानपेक्षा जास्त लोकांचे प्रेम भाग्यश्रीला मिळाले. या सिनेमानंतर तिच्याकडे चित्रपटाच्या रांगाच रांगा लागलाय होत्या. मात्र सलमानला या सिनेमातून यश मिळूनही काम मिळत नव्हते. तो मैने प्यार किया रिलीज झाल्यानंतर जवळपास 6 महिने रिकामा होता. याबद्दल खुद्द सलमानच एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती.

सर्वाना वाटले हिंदी सिनेसृष्टीला एक नवीन दमदार अभिनेत्री मिळाली. अनेकांनी तर भाग्यश्रीला लंबी रेस का घोडा देखील म्हटले, पण भाग्यश्रीने या सिनेमानंतर काही महिन्यातच लग्न करून सिनेमांना बाय बाय म्हटले. भाग्यश्रीने उद्योगपती हिमालय दासनीसोबत एका मंदिरात लग्न केले. हिमालय आणि तिची ओळख शाळेपासून होती. मात्र या नात्याला भागयश्रीच्या घरच्यांचा विरोध होता. अशातच तिने आणि हिमालयाने मैने प्यार किया प्रदर्शित झाल्यानंतर लगेच पळून जाऊन लग्न केले. या लग्नाला फक्त सुरज बडजात्या, सलमान खान आणि दोन मित्र एवढेच लोकं उपस्थित होते.

भाग्यश्रीला आणि हिमालय यांना अभिमन्यू आणि अवंतिका नावाची दोन मुलं आहेत. सध्या भाग्यश्री जरी अभिनयपासून लांब असली तरी ती लवकरच काही सिनेमांमध्ये झळकणार आहे. शिवाय सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते. तिला लाखो फॅन्स फॉलो करतात.(april 2021 bhagyashree birthday special know some interesting facts about her)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणवीरला भूमी पेडणेकरमुळे मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक; अभिनेता म्हणाला, ‘ती नसती तर…’

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! रणबीर-श्रद्धाचे नवीन गाणे ‘शो मी द ठुमका’ रिलीज, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा