Saturday, July 27, 2024

रणवीरला भूमी पेडणेकरमुळे मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक; अभिनेता म्हणाला, ‘ती नसती तर…’

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत एक अनाेखे स्थान निर्माण केले आहे. मात्र, ज्यांच्या माध्यमातून त्याला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली, त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशात अलीकडेच अभिनेत्याने नेटफ्लिक्स शाे ‘द रोमॅंटिक्स’मध्ये बाॅलिवूडमध्ये ब्रेकमिळण्याबाबत सांगितले आहे.

रणवीर सिंग (ranveer singh) याने सांगितले की, “त्याला ब्रेक मिळवून देण्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर (bhumi pednekar ) हिचा मोठा हात आहे. त्या काळात भूमीने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले नव्हते. कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने त्याचे फोटो चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांना दाखवले. मात्र, आदित्य यांना मी विशेष देखना किंवा आकर्षक वाटलाे नव्हताे. त्यामुळे कास्टिंग डायरेक्टर शानूच्या आग्रहामुळे माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. मला हा सीन शानूच्या असिस्टंटने समजावून सांगितला होता, जे दुसरी कोणी नसून भूमी पेडणेकर होती.”

रणवीरने सांगितले की, “ती खरोखरच प्रोफेशनल होती, तिने माझ्यासाठी गोष्टी खूपच साेप्या केल्यात. तिने सीनमध्ये माझ्यासाठी माझ्या जाेडिदाराची भूमिका साकराली.” रणवीर पुढे म्हणाला की, “भूमिमुळेच मी ‘बँड बाजा बारात’साठी इतके चांगले ऑडिशन देऊ शकलो. आदित्य चोप्रा यांनी माझे ऑडिशन पाहिले आणि त्यानंतर मला सांयकाळी लगेच बोर्डात घेतले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

यश चोप्रा यांच्या स्मरणार्थ 14 फेब्रुवारी रोजी ‘द रोमॅंटिक्स’ शाेची सुरुवात झाली होती. जे जागतिक स्तरावर रिलीज करण्यात आली. यश चोप्रा यांना रोमँटिक चित्रपटांचे जनक म्हटले जाते. ‘द रोमॅंटिक्स’शोचे दिग्दर्शन स्मृती मुंद्रा यांनी केले होते. त्या इंडियन मॅचमेकिंग आणि नेव्हर हॅव आय एव्हरची फ्रँचायझी आहे, जे या नेटफ्लिक्स शोसह परतल्या आहेत.(bollywood actor ranveer singh said he got debut film band baaja baaraat because of bhumi pednekar she helped him in audition )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा