Monday, July 8, 2024

रूप तेरा मस्ताना! चंकी पांडेच्या मुलीने केले ‘ब्लँक एँड व्हाईट’ फोटो शेअर, दिसतेय खूपच सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंडस्ट्रीमधील कमी वयाच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. खूप कमी वयात अभिनेत्री बरीच प्रसिद्ध झाली आहे. तिची फॅन फॉलोविंगही बरीच आहे. यामुळे तिचे फोटो व व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात.

अनन्या तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक एँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत तिने केस मोकळे सोडले आहेत. यासह तिने अगदी हलका मेकअप केला आहे.

अनन्या पांडेच्या या फोटोंना इंस्टाग्रामवर चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. आतापर्यंत 6 लाखांहून अधिक युजर्सने या फोटोला लाईक केले आहे. याव्यतिरिक्त बऱ्याच चाहत्यांनी फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अनन्या पांडेने 2019 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनतर ती ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पिली’ या चित्रपटात दिसली. हिंदी आणि तेलुगु भाषांमध्ये बनणाऱ्या ‘लायगर’ या चित्रपटामध्ये अनन्या सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

माध्यमांनुसार ‘लायगर’ चित्रपट बर्‍याच भाषांमध्ये डब केला जाईल. हा चित्रपट अनन्याचा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट असेल आणि विजयही पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर काम करत आहे. याव्यतिरिक्त करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली

हे देखील वाचा