Tuesday, June 18, 2024

सेलिब्रिटींचे महागडे छंद! विराट कोहलीप्रमाणे, उर्वशीही पिते महागडे ‘ब्लॅक वॉटर’, किंमत वाचून सरकेल पायाखालची जमीन

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे आणि तिच्या महागड्या जीवनशैलीमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशी तिच्या महागड्या कपड्यांमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर, आता अचानक उर्वशी रौतेलाच्या पाण्याच्या बाटलीची खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर या बाटलीमुळे पुन्हा एकदा उर्वशी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात कनेक्शन जोडले जात आहे. उर्वशीचा आज वाढदिवस आहे. 25 फेब्रुवारी 1994 रोजी तिचा जन्म झाला. या निमित्ताने तिच्या जीवनाविषयी जाणुन घेऊ या…

नुकतेच, उर्वशीला विमानतळावर स्पॉट केले होते. तिथे तिच्या हातात पाण्याची एक बाटली दिसली. ज्यामध्ये ‘ब्लॅक वॉटर’ होते. या पाण्याची किंमत प्रतिलीटर 3 ते 4 हजार रुपये आहे. तसेच, विराट कोहलीसह काही अन्य सेलिब्रिटीही हे महागडे आणि खास पाणी पितात.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या हातात दिसणार्‍या पाण्याच्या बाटलीमध्ये नैसर्गिक क्षारयुक्त पाणी असते. हे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास खूप मदत करते. या ‘ब्लॅक वॉटर’ची पीएच व्हॅल्यू खूप जास्त आहे. कोविड-19 दरम्यान विराट कोहलीसह इतरही अनेक सेलेब्रिटींनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी या पाण्याचे सेवन करण्यास सुरुवात केली.

उर्वशीने 2012 मध्ये आय एम सी- मिस इंडियाचा मुकुट आपल्या नावावर केला होता. त्यांनतर 2013 साली आलेल्या ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या व्यतिरिक्त ती 2016 मध्ये आलेल्या ‘सनम रे’ चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात उर्वशीसोबत यामी गौतम आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत होते.(april 2021 bollywood like virat kohli urvashi rautela drink black water that costs rs 3000 per litre)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हम दिले दे चुके सनम’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भन्साळींचे सिनेमे; तरीही बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट
200 काेटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर का रडला ढसा ढसा ? एकदा वाचाच

हे देखील वाचा