‘यमला पगला दिवाना‘ चित्रपटात आपण धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांचा अप्रतिम अभिनय पाहिला आहे. बॉलिवूडच्या या शक्तिशाली कलाकारांनी त्यांच्या विनोदी स्टाईलने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाच्या यशानंतर त्याचा दुसरा भागही बनला होता, परंतु हा दुसरा चित्रपट चालू शकला नाही. पण, बाप-मुलाची जुगलबंदी पडद्यावर दिसण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही सनी देओल वडील धर्मेंद्रसोबत ‘सल्तनत‘ आणि ‘सनी‘ चित्रपटांमध्ये एकत्र दिसला होता.
चित्रपट कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देणार्या सनी देओलने एकदा वडील धर्मेंद्र यांना निराश केले होते. मुलामुळे धर्मेंद्र यांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले होते. आम्ही बोलत आहोत सन 1999 बद्दल, जेव्हा बॉबी देओल आणि करिश्मा यांच्यासोबत सनी देओलला ‘लंडन’ चित्रपट बनवायचा होता. यासाठी त्याने दिग्दर्शक गुरिंदर चड्ढाला साईन केले होते. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, पण काही दिवसातच सनी आणि गुरिंदर यांच्यात चित्रपटावरून वाद झाले.
गुरिंदर चड्ढाने चित्रपट सोडल्यानंतर सनीने स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. सनीने या चित्रपटाचे नाव बदलून ‘दिल्लगी’ केले आणि करिश्माची जागा अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने घेतली. सनी देओलच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 60 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. चांगली स्टारकास्ट असूनही चित्रपट वाईट रीतीने फ्लॉप झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 21 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात धर्मेंद्रचे पैसे गुंतवले गेले होते, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
सनी देओल हा एक उत्तम अभिनेता आहे. ज्याने ‘विश्वात्मा’, ‘घायल’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘जिद्दी’ यांसारख्या जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण दिग्दर्शनाच्या बाबतीत त्याला ते यश मिळाले नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही नक्की वाचा-
ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय? म्हणत उर्मिलाने शेअर केली पोस्ट
अभिनेते शरद पोंक्षेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, ‘लता दीदी देशासाठी निघाल्या होत्या लढायला…’