Sunday, April 14, 2024

अभिनेते शरद पोंक्षेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, ‘लता दीदी देशासाठी निघाल्या होत्या लढायला…’

मराठी इंडस्ट्रीमधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेता शरद पोंक्षे हे दमदार अभिनत्यासोबतच खूप चांगले वक्ता देखिल आहेत. ते सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. युट्युबवरील त्यांच स्वत:च चॅनेल असून सतत प्रेक्षकांना सावरकारांविषयी माहिती देत असतात. अभिनेता सावरकरांच्या विचारसरणीवर चालत असून त्यांनी नुकतंच लता मंगेशकर यांच्या विषयी एक किस्सा शेअर करत  नवीन व्हिडिओमध्ये माहिती दिली होती. जो सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आजपर्यत आपल्या युट्युब चॅनेलवरुन सावरकारांविशयी अनेक व्याख्याने प्रेक्षकांपर्यत पोहोचवली आहेत. मात्र त्यांचा नवीन व्हिडिओने सोशल मीडिवर चांगलीच धामाल करत आहे. (Sharad Ponkshe Shares One memory about Sawarkar And Lata Mangeshkar)

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात की, “एकवेळेस लता मंगेशकर सावरकरांना म्हणाल्या होत्या की, तात्या मला पण तुमच्या या अभिनव भारत संघटनेमध्ये यायचं आहे आणि क्रांतीकार्यात सहभागी व्हायचं आहे.” तेव्हा तात्याराव म्हणाले होते की, “वेडी आहेस का तु? परमेश्वराने तुला गाणं दिलं आहे. प्रत्येकानेच हातामध्ये शस्त्र घेऊन क्रांती केलीच पाहिजे हा फार चुकीचा समज आहे. क्रांती फार वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तु अजिबात आमच्या भारत संघटनेत येऊ नकोस. स्वत:चा जीव धेक्यात घालू नकोस. परमेश्वरानं जे दिलं आहे त्याचा चांगला वापर कर आणि भारतातील लोकांना तुझ्या गाण्याचा अस्वाद देण्याचं काम कर. तुझ्या गाण्याने देशाची सेवा कशी करता येइल याचा विचार कर.” पोक्षे सतत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सावरकरांची विचारसरणी प्रेक्षकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे त्यांमुळे त्यांना कधाकधी ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बाबो! बिग बॉसमध्ये सौंदर्या शर्मा आणि शालीन भनोट सोबत घडला लज्जास्पद किस्सा
अंगूरी भाभीचे पुन्हा एकाद होतंय आगमन, ‘या’ कार्यक्रमामध्ये साकारणार मुख्य भूमिका

हे देखील वाचा