Friday, March 29, 2024

प्रेमासमाेर नतमस्तक! ‘या’ स्टार्सनी लग्नासाठी चक्क धर्मच टाकला बदलून, पाहा यादी

प्रेम हे कोणत्याही शब्दात किंवा वाक्यात मांडता येत नाही. म्हणूनच म्हणतात की, जेव्हा प्रेम असते तेव्हा माणसाला जोडीदाराशिवाय काहीच दिसत नाही. उच्च-नीच, धर्म-जात, प्रेम ही सर्व बंधने तोडते. बॉलीवूडमध्येही असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी प्रेम आणि लग्नासाठी प्रत्येक बंधने तोडली, काहींनी तर चक्क धर्मच बदलला. चला, तर जाणून घेऊया अशाच काही स्टार्सबद्दल…

अभिनेत्री शर्मिला टागोर (sharmila tagore) या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनेत्रीचे मन क्रिकेटपटू मन्सूर अली खान यांच्यावर आले आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. शर्मिला यांनी हे नाव बदलून बेगम आयशा सुलताना असे ठेवले. मात्र, आजही त्या शर्मिला टागोर या नावाने प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री अमृता सिंग (amruta singh) हिने मन्सूर अली खान यांचा मुलगा अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. अमृता सिंग शीख कुटुंबातून आलेली आहे, पण सैफच्या कुटुंबाने तिला शीख म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. यानंतर अमृता सिंहने इस्लाम धर्म स्वीकारला पण 13 वर्षानंतर त्यांचे लग्न तुटले.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (dharmendra) हे त्यांच्या काळातील लाेकप्रिय नायक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? धर्मेंद्र यांनीही धर्म बदलला. खरंतर धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये येण्याआधीच विवाहित होते, पण त्यांचे मन हेमा मालिनी यांच्यावर आले होते. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर अभिनेत्यापासून विभक्त झाली परंतु तिने त्यांना घटस्फोट देण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि लग्न केले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस (nargis) आणि सुनील (sunil dutt) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. अभिनेत्री नर्गिस मुस्लिम होत्या, पण त्या सुनील दत्तच्या प्रेमात पडल्या आणि अभिनेत्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्यांनी सुनील दत्त यांच्याशी हिंदू रीतीरिवाजाने लग्न केले आणि त्यांचे नाव बदलून निर्मला दत्त ठेवले.(these celebrities converted their religion for marriage from ayesha takia to dharmendra)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी नऊ वर्षांची होते तेव्हा…’, लग्नाआधी शारीरिक संबंधांवर सेलिब्रिटींनी केला धक्कादायक खुलासा

‘अंड्याची भूर्जी आणि राखी सावंतची मर्जी…’, मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच ड्रामा सुरू

हे देखील वाचा