Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मलायका अरोराने केले होते जज, आता इमरान हाश्मीने बदलले भाग्य; वाचा ‘या’ अभिनेत्रीविषयी

इमरान हाश्मीचे नुकतेच रिलीझ झालेले ‘लुट गए’ हे गाणे यूट्यूबवर धमाल करत आहे. या गाण्याला 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात इमरानसोबत दिसणाऱ्या युक्ती थरेजाची लोकप्रियताही वाढतच चालली आहे. याआधीही बर्‍याचदा तुम्ही टीव्हीवर युक्ती थरेजाला पाहिले असेल, परंतु तिला या गाण्यापासून खरी ओळख मिळाली आहे.

या गाण्यात युक्ती एका वधूच्या वेशात दिसली आहे. जिला लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. पण यानंतर इमरान हाश्मीची तिच्या लग्नात एन्ट्री होते, जो एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असतो. दरम्यान, दोघे एकमेकांच्या जवळ येतात. शेवटी गुंड इमरानवर हल्ला करत असताना युक्तीला गोळी लागून ती मरण पावते. गाण्याचा शेवट भलेही रडवणारा आहे, पण या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

https://www.instagram.com/p/CLY3PNxh00Z/?utm_source=ig_web_copy_link

कशी झाली युक्तीच्या कारकिर्दीची सुरुवात
युक्ती सध्या 21 वर्षांची आहे आणि तिने मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. युक्तीने 2018 साली मॉडेलिंगची सुरुवात केली आणि त्यानंतर ती बर्‍याच जाहिरातींमध्ये दिसली. युक्तीला ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर’ हा लोकप्रिय शो मिळाला. ज्याचे जज मलायका अरोरा, मसाबा गुप्ता आणि मिलिंद सोमण हे होते. या शोमध्ये युक्तीने एकापेक्षा एक परफॉर्मेंस दिले, ज्यावरून तिन्ही जज खूप प्रभावित झाले होते.

यापूर्वीही बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसली आहे युक्ती
युक्ती यापूर्वी बर्‍याच व्हिडिओंमध्ये दिसली आहे, परंतु त्या गाण्यांनी तिला विशेष ओळख दिली नाही. ‘इक सुपना, ओए होय’ या गाण्याच्या कव्हर व्हर्जनमध्ये ती दिसली आहे. पण ‘लुट गए’ गाणे आणि इमरान हाश्मी तिच्यासाठी भाग्यवान ठरले.

युक्तीचे हॉट आणि बोल्ड फोटो
युक्ती यापूर्वी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती, परंतु गेल्या वर्षापासून ती खूप सक्रिय राहायला लागली आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले, तर आपल्याला तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहायला मिळतील.

युक्ती नेहमी तिचे हॉट फोटो शेअर करत असते. ती अनेकदा वेस्टर्न लूकमध्येच राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

-तब्बल ३० वर्षांनंतर अनुपम खेर यांचे टॉलिवूडमध्ये कमबॅक, बुमराहच्या कथित गर्लफ्रेंडसोबत करणार ‘या’ सिनेमात काम

हे देखील वाचा