तब्बल ३० वर्षांनंतर अनुपम खेर यांचे टॉलिवूडमध्ये कमबॅक, बुमराहच्या कथित गर्लफ्रेंडसोबत करणार ‘या’ सिनेमात काम

anupam kher comeback in telugu industry after 30 years and he will play in jasprit bumrah rumoured girlfriend film karthikeya 2 south bhojpuri mogi


बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. हिंदी चित्रपट ते इंग्रजी ड्रामा सीरिजमधील कामगिरीबद्दल देशाबाहेरही त्यांचे कौतुक केले जाते. अनुपम यांनी पाच वेळा चित्रपटातील कॉमिक रोलसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे.

त्यांनी थिएटरमध्ये अभिनय सुरू केला आणि अल्पावधीतच ते मोठ्या पडद्यावर यशस्वी अभिनेता झाले. त्यांनी आतापर्यंत शेकडो चित्रपटांमध्ये वेगवेगळी पात्रं साकारली आहेत. 7 मार्च रोजी त्यांनी 66 व्या वर्षात पदार्पण केले. या खास प्रसंगी त्यांना एक अद्भुत भेट मिळाली आहे.

वाढदिवशी खेर यांना मिळाली ही खास भेट
अनुपम खेर यांना ‘कार्तिकेय 2’ या तेलुगु चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अनुपम यांच्यासाठी यापेक्षा चांगली बातमी आणखी काय असू शकते. या चित्रपटामध्ये दक्षिण भारतीय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही मुख्य भूमिकेत आहे, जिचे नाव सध्या भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहसोबत विवाहासंबंधित ट्रेंड होत आहे.

तब्बल 30 वर्षांनंतर खेर यांचे टॉलिवुडमध्ये कमबॅक
अनुपमा आणि निखिल अभिनित ‘कार्तिकेय 2’ या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अनुपम यांची निवड झाली आहे. 7 मार्च रोजी अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन मोठी घोषणा केली. अग्रवाल यांनी ट्वीट करून पोस्टमध्ये लिहिले की, “30 वर्षांनंतर पुन्हा अनुपम खेर तेलुगु चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहेत. ‘कार्तिकेय 2’ मध्ये धन्वंतरी नावाच्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत ते पडद्यावर दिसणार आहेत.”

निराळे असेल अनुपम यांचे पात्र
वृत्तानुसार, तेलुगु चित्रपटातील अनुपम यांची व्यक्तिरेखा अनोखी आणि आतापर्यंतच्या भूमिकेपेक्षा वेगळी असेल. कथेत अनुपम चांगले आणि वाईट दोन्ही पात्र साकारतील किंवा आपण असे म्हणू शकतो की कलाकार, खलनायक आणि नायकाची भूमिका ते साकारतील. अनुपम त्यांच्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. 1982 मध्ये ‘आगामन’ चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

2014 मध्ये रिलीझ झाला होता ‘कार्तिकेय’चा पहिला भाग
या चित्रपटाचा पहिला भाग 2014 मध्ये रिलीझ होता, जो चांगलाच गाजला. ‘कार्तिकेय’ या रहस्यमय थ्रिलर चित्रपटाद्वारे निखिल सिद्धार्थची लोकप्रियता प्रचंड वाढली. या अभिनेत्याने मार्च 2020 मध्ये जाहीर केले होते की, तो कार्तिकेयाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. तसेच, या चित्रपटाचे दिग्दर्शन चंदू मोन्डेती करीत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार


Leave A Reply

Your email address will not be published.