हरियाणवी डान्सर आणि कलाकार सपना चौधरी तिच्या डान्सने अवघ्या प्रेक्षक वर्गाला वेड लावत असते. तिच्या डान्सचे लाखो दिवाने आहेत. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक तिचा चाहता आहे. सपनाला टक्कर देणारे अनेक हरियाणवी कलाकार चर्चेत येत आहेत. अशीच एक कलाकार म्हणजे प्रांजल दहिया. तिचे लूक्स आणि डान्स दोन्हीही सपना चौधरीला कडक टक्कर देत आहेत. प्रांजल दहियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रांजल दहिया अगदी सपना चौधरीसारखी दिसत आहे. प्रांजलच्या डान्स स्टेप्सही सपना चौधरीसारख्याच आहेत. हे पाहून सपना आणि प्रांजलमध्ये फरक करणे चाहत्यांना कठीण जात आहे. व्हिडिओमध्ये प्रांजल दहियाचा संपूर्ण लूक सपना चौधरीसारखा दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा हरियाणवी सूट परिधान केला आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत 35 लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज आणि 44 हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
https://youtu.be/jSGnObdPRU0
हरियाणवी संगीत उद्योगातील प्रांजल दहियाचे यश हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. तिचा अभिनय आणि डान्स पाहून प्रेक्षकांना असे वाटते की, तिचे वय अधिक असेल, परंतु ती केवळ 24 वर्षांची आहे. इतकेच नव्हे तर प्रांजल दहियाने गेल्या वर्षी बारावी पूर्ण केली आहे आणि आता ती पदवी शिक्षण घेत आहेत. टिकटॉकमुळे तिची लोकप्रियता कशी वाढली, हे तिनेे एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. टिकटॉकवर लोकप्रिय झाल्यानंतर तिच्या बहिणीने तिला संगीत उद्योगात जाण्यासाठी प्रेरित केले.
रेणुका पवारचे हरियाणवी गाणे ’52 गज का दामन’ 1 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदर्शित झाले. या गाण्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. यात अमन जाजी आणि प्रांजल दहियाने अभिनय केला आहे. गाण्याचे बोल मुकेश जाजी यांनी लिहिले असून त्याचे संगीतकार अमन जाजी आहेत. या गाण्यामुळेही प्रांजल दहियाला बरीच प्रसिद्धी मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर