‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात आपल्या खेळीने अनेकांची मने जिंकणारा खेसारी लाल यादव हा एक अभिनेताच नाही, तर गायक आणि मॉडेल म्हणूनही नेहमीच दिसून आला आहे. आपल्या अभिनयापेक्षा तो आपल्या डान्स व्हिडिओमार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याचे यूट्यूबवरील व्हिडिओ चाहत्यांच्या मनावर नेहनीच राज्य करत असतात. केवळ भोजपुरी नव्हे तर इतर चित्रपसृष्टीत देखील त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. ज्यावेळी त्याने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता, तेव्हा त्याच्या खेळीने अनेकनजण प्रभावित झाले होते. त्यानंतर तो अधिकच लाईमलाईटमध्ये आला होता.
खेसारी लालचे प्रत्येक व्हिडिओ हे यूट्यूबवर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. कमी तासांतच त्याच्या व्हिडिओला अधिक व्ह्यूज मिळालेले आपण नेहमीच पाहतो. तो लगातार होळीच्या अनेक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळीच चमक दिसून येते. त्याचे प्रत्येक व्हिडिओ कोणाला आवडणार नाही असे कधीच होणार नाही.
याचदरम्यान त्याचा आणि शिल्पी राजचा एक मोठ्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ते दोघे ‘अपनी तो जैसे तैसे’ या बॉलिवूड गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत. कोट्यवधी प्रेक्षकांनी त्यांचा हा व्हिडिओ पहिला आहे. ज्यावर चाहत्यांकडून अक्षरश: दोघांसाठी प्रेमाचा वर्षाव होत आहे. हे गाणे बॉलिवूडमधील मिका सिंगच्या ‘आप का क्या होगा’ या खऱ्या गाण्याला भलतीच टक्कर देताना दिसत आहे.
या गाण्याला खेसारी यादव आणि शिल्पीने आवाज तर दिलाच आहे, पण दोघांनी सुद्धा जोरदार ठुमके देखील लगावले आहेत. त्या दोघांचा अंदाज या व्हिडिओत बघण्यालायक आहे. हा व्हिडिओ पाहिला, तर प्रेक्षक या गाण्यावर थिरकायला नक्कीच लागतील. या व्हिडिओला अवघ्या २ महिन्यातच ४ कोटी ९५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर एक लाखांपेक्षा अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
या गाण्याला आर्या शर्माने संगीत दिले आहे, तर विजय चौहान यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याच्या मूळ हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचे झाल्यास हे गाणे तेरा करोडच्या आसपास लोकांनी पाहिले होते.
जर आपण वेळेचा विचार केला, तर या भोजपुरी गाण्याने फार कमी कालावधीत अधिक जास्त व्ह्यूज मिळण्याचा रेकॉर्ड केला आहे. टी-सीरिजने हे गाणे दहा वर्षांपूर्वी गाणे रिलीझ केले होते, ज्यात दीपिका पदुकोण, रितेश देशमुख, अक्षर कुमार, लारा दत्ता या तारकांनी या गाण्यात डान्स केला होता.
सन २०१२ मध्ये ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटाच्या माध्यमातून खेसारी लाल यादव याने चित्रपटात भूमिका साकारली आहे. सन २०१६ साली त्याला भोजपुरी चित्रपटात सर्वोत्तम अभिनेता म्हणून गौरविण्यात आले होते, तर २०१७ मध्ये ‘यूपी रतन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यासोबतच त्याने ‘जान तेरे नाम’, ‘नागीण’, ‘लहू के रंग’, ‘दूध का कर्ज’, ‘कच्चे धागे’, ‘ज्वाला’, ‘कसम पैदा करने वाले की’ अशा अनेक भोजपुरी चित्रपटात काम केले आहे.
सोबतच त्याचे आगामी चार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर
-बॉलिवूडच्या गाण्यांची देशाबाहेरही जादू कायम! हिंदी गाण्यावरील हॉलिवूड मॉडेलचा डान्स व्हायरल