‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ‘समंथा अक्किनेनी’ ही आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या अंदाजाने देखील प्रसिद्ध झाली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची माहिती ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. समंथा ही ‘डोन्ट रश चॅलेंज’चा भाग झाली होती. तिने या गाण्यावर डान्स करत तिचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यात ती खूपच कूल दिसत आहे.

समंथाने 7 मार्चला हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डिजिटल कंटेंट क्रिएटर अनुषा स्वामी हिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये समंथा खूपच आकर्षक दिसत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना असे लिहले आहे की, “विकी कौशलने मला हे करण्यासाठी जबरदस्ती केली आहे. यामध्ये अनुषा स्वामीचे देखील कौतुक झाले पाहिजे. मला फक्त एक वर्षाचा वेळ द्या. मी तिथे पोहोचेल जिथे आज तुम्ही आहात.”

समंथाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या गाण्यातील तिचे मुव्ह आणि लूक प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. आतापर्यंत १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

विकी कौशलने आपल्या टीमसोबत हा डान्स करून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. विकीने या व्हिडिओसोबत असे लिहले होते की, “माझ्या अंगात देखील डोन्ट रश चॅलेंजचा किडा घुसला आहे. यावरील व्हिडिओ बघण्यात मी माझा बराच वेळ वाया घालवला आहे. मग आता असा विचार केला की, चला तर आता यावर व्हिडिओ बनवण्यात काही वेळ घालवू या. हा माझा रील आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

-बॉलिवूडच्या गाण्यांची देशाबाहेरही जादू कायम! हिंदी गाण्यावरील हॉलिवूड मॉडेलचा डान्स व्हायरल

-दिशा पटानीचा किक मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘टायगर श्रॉफच्या संगतीचा परिणाम’


Leave A Reply

Your email address will not be published.