Thursday, April 25, 2024

रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी ‘सोनू वालिया’, उंचीमुळे मिळत नव्हते चित्रपटात काम

सिनेजगतात काम करण्याची इच्छा भल्याभल्यांना असते. पण असे म्हणतात, ‘जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं.’ हे चित्रपटसृष्टीला अगदी चपखलपणे बसते. चित्रपटसृष्टीत टिकणे हे कौशल्याचे काम असते. ‘खून भरी मांग’ या सारख्या चित्रपटात रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी सोनू वालिया दीर्घकाळ पडद्यावर टिकेल असे वाटले होते, पण तसे झाले नाही. शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) तिने आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या जीवनातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिनांक १९ फेब्रुवारी १९६४ रोजी दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सोनू वालियाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यानंतर तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता. सन १९८५ साली तिने ‘मिस इंडियाचा किताब’ जिंकला. यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचा रस्ता हा मोकळा झाला होता. ८० आणि ९०च्या दशकात चित्रपटसृष्टीत सोनुने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत ३०पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनयदेखील केला होता.

सन १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘खून भरी मांग’ या चित्रपटात तिने पहिल्यांदा काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्री रेखा हिने प्रमुख भूमिका साकारली होती. परंतु सोनुनेदेखील याच सिनेमातून आपली चांगली ओळख निर्माण केले होती. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा’ फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला होता.

सन १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आकर्षण’ हा चित्रपट तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. त्या काळात अशा प्रकारचे सीन्स देणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. एका झऱ्याच्या बाजूला तिचे काही हॉट सीन शूट करण्यात आले होते, ज्याने अत्यंत खळबळ माजवली होती. सोनुने इतके बोल्ड दृश्य दाखवण्याची हिंमत केल्यामुळे एका रात्रीमध्येच ती चर्चेत आली होती.

यापश्चात ‘महादेव’, ‘क्लर्क’, ‘महासंग्राम’, ‘हातिमताई’, ‘तेजा’, ‘नंबरी आदमी’, ‘प्रतिकार’, ‘स्वर्ग जैसा घर’, ‘अपना देश पराये लोग’, ‘दिल आशियाना है’ अशा चित्रपटांमध्ये ती दिसली होती. परंतु तिला त्यात आपली योग्य अशी जादू दाखवता आली नाही. सन २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जय माँ शेरावालीये’ हा तिच्या कारकीर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला.

आपल्या उंचीमुळे तिला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. सोबतच तिने बॉलिवूडमधील तीन खानांचा उल्लेख देखील केला, ज्यांच्या मुळे तिला काम मिळण कठीण झाले होते. कारण तिची उंची त्यांच्यापेक्षा खूप जास्त होती. असे तिने एका मुलाखतीत म्हटले होते.

चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर सोनूने लग्न केले, ते एनआरआय सूर्यप्रकाश यांच्यासोबत. त्यांचे काही काळाने निधन झाले. त्यानंतर तिने चित्रपट निर्माता प्रताप सिंग यांच्यासोबत दुसरे लग्न केले. सध्या ती यूएसएला राहत असून तिला एक मुलगी आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाजीगरमधल्या ‘छुपाना भी नहीं आता’ गाण्यातील अभिनेत्याने अगदी कमी वयातच सोडले जग, वाचा त्याची कहानी

-पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ सुखी संसार करुन घटस्फोट घेणारे बॉलीवूड तारे, एकाचा संसार तर २२ वर्षांनी मोडला

-चित्रपटसृष्टीला बहारदार संगीत देणारे ‘मोहम्मद खय्याम’, त्यांच्या जबरदस्त संगीताने केली प्रेक्षकांवर जादू

हे देखील वाचा