अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या पूजा भट्ट 8 मार्च रोजी रिलीज होत असलेल्या ‘बॉम्बे बेगम्स’ या वेब सिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान पूजा यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी चित्रपटातील पहिल्या किसिंग सीनबद्दलचा किस्सा सांगितला. तसेच, त्यावेळी त्यांचे वडील महेश भट्ट यांनी त्यांना काय सल्ला दिला होता हेही सांगितले.
पूजा भट्टने त्यांचा पहिला किसिंग सीन कारकिर्दीतील तिसऱ्या चित्रपटात ‘सडक’मध्ये दिला होता. यात संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट हेच होते.
तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते – पूजा
पूजा म्हणाल्या, “मी 18 वर्षांची होते, जेव्हा मला माझ्या आयकॉन संजय दत्तसह एक किसिंग सीन द्यावा लागला. मला त्या व्यक्तीला किस करायचे होते, ज्या व्यक्तीचे पोस्टर्स माझ्या खोलीत लावलेले असायचे. मला आठवतंय, पप्पांनी मला एका बाजूला नेऊन काहीतरी सांगितले, जे मला आयुष्यभर लक्षात राहिले.
पुजाने वडीलांनी तेव्हा काय सांगितले याबद्दल खुलासा केलाय. ती म्हणाली की महेश भट्ट म्हणजे वडिलांनी मला तेव्हा सांगितले होते की, “पूजा, तुला जर हे अश्लील वाटत असेल तर ते अश्लिलच दिसेल. म्हणून तुला इनोसन्स, ग्रेस आणि डिग्निटीसह किस करण्याची किंवा प्रेमाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे.”
राहुल बोससोबत 19 वर्षानंतर करतेय पुन्हा काम…
‘बॉम्बे बेगम्स’ या सिरीजमध्ये पूजा भट्टचा सहकारी अभिनेता राहुल बोस आहे. हे दोघे तब्बल 19 वर्षानंतर एकत्र काम करत आहेत. यापूर्वी ते राहुल बोस दिग्दर्शित ‘एवरीबॉडी सेज आई एम फाइन’ (2002) मध्ये एकत्र दिसले होते.
पूजा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, “राहुल बोस शेवटचा व्यक्ती आहे ज्याने मला ‘एवरीबॉडी सेज आई एम फाइन’ मध्ये कास्ट करण्याची हिम्मत केली. त्याने मला एकही पर्याय दिला नाही. तो माझा चांगला मित्र आहे.
मी सिनेमापासून निराश झाले होते. जेव्हा राहुलने मला या भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा मी म्हणाले- “कसा मित्र आहेस तू? मी आजारी आहे आणि तू मला भूमिकेची ऑफर देतोय.” मग त्याने आग्रह केला की तान्याची भूमिका तुझ्यापेक्षा उत्तमरित्या कोणीही करू शकणार नाही.”