काय सांगता! ‘मैने प्यार किया’च्या यशानंतर ‘भाईजान’ला मिळाले नव्हते एकाही चित्रपटात काम, वडिलांनी केली होती निर्मात्यांकडे विनंती


बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांतून त्याने रसिकांची मने जिंकायची कसर सोडली नाही. प्रत्येक चित्रपटाने त्याला आपली नवीन ओळख निर्माण करून दिली. ‘बिवी हो ती ऐसी’ हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट असला, तरी त्याला त्याची खरी ओळख करून दिली ती ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने.

सलमानच्या कारकीर्दीतील हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान ठरला होता. या सिनेमाने त्यावेळी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली, आणि प्रत्येकाच्या हृदयात त्याने आपले स्थान निर्माण केले होते. परंतु या चित्रपटाच्या यशानंतर त्याला खूप चित्रपटांची ऑफर आली असेल, असे आपल्याला वाटते. परंतु तसे झाले नाही. हे वक्तव्य खुद्द सलमान खान याने केले आहे.

त्याचे झाले असे की, या चित्रपटाने त्यावेळी बरीच कमाई केली होती. सलमान आणि भाग्यश्रीच्या जोडीला प्रेक्षक फारच पसंत करायचे. या चित्रपटाची कथा खूप सुंदर होती. त्यात हे जोडपे प्रेमात पडतात आणि त्यांना प्रेमापोटी अनेक कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते. हा चित्रपट खूप काळ चालला होता. परंतु या सिनेमाच्या यशानंतर सहअभिनेत्री भाग्यश्री हिने लग्न केले होते, आणि सिनेमात काम करायचे सोडून दिले होते.

‘मैने प्यार किया’ या चित्रपटानंतर त्याला कोणत्याच सिनेमाची ऑफर आली नाही. जवळपास चार ते पाच महिने कोणतेच काम त्याच्या पदरी पडले नव्हत. अशातच त्याला असे वाटू लागले की, मला आता पुढे कोणतेच काम मिळणार नाही. कारण त्याचदरम्यान भाग्यश्रीने सुद्धा मनाशी पक्क केलं होतं की यापुढे कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही आणि लग्न करून चित्रपटसृष्टीतून बाहेर पडणार. तिने केले सुध्दा तसेच. याचदरम्यान ती हिमालय दासानीसोबत लग्न करून मोकळी झाली आणि संपूर्ण चित्रपटाचे श्रेय देखील तिलाच मिळाले.

सलमानचे वडील सलीम खान यांना या गोष्टीत हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी जीपी सिप्पी यांना सलमान खान याला आपल्या चित्रपटात घेण्याची विनंती केली. सलीम यांच्यानुसार, सलमानला त्यांनी आपल्या पुढील चित्रपटात घेतले. ही बातमी जेव्हा अनेक मासिकात झळकली, तेव्हा अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्याला आपल्या सिनेमात काम करण्याची ऑफर केली.

भाग्यश्रीला करियरमध्ये सर्वात पहिला ब्रेक ‘कच्ची धूप’ या टीव्ही मालिकेतून मिळाला. हा तिच्या करियरमधील टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर ‘सीआयडी’ आणि ‘स्म्रीती’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून ती प्रसिद्ध झाली. सर्वात मोठा फायदा तिला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने करून दिला. हा चित्रपट तिचा पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. ९० च्या दशकातील ‘घर आया मेरा परदेसी’ हा १९९३ मध्ये रिलीझ झालेला तिचा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर तिने दीर्घकाळ बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सन २००१ मध्ये ‘हॅलो गर्ल्स’ आणि २००६ मध्ये ‘हमको दीवाना कर गये’ या चित्रपटात तिची भूमिका होती.

अभिनेता सलमान खान याने आपल्या आगामी ‘अंतिम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले असून या चित्रपटात तो शीख पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तो ‘बिग बॉस १४’ चे सूत्रसंचालन करताना दिसला. तो आपल्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाजीगरमधल्या ‘छुपाना भी नहीं आता’ गाण्यातील अभिनेत्याने अगदी कमी वयातच सोडले जग, वाचा त्याची कहानी

-पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ सुखी संसार करुन घटस्फोट घेणारे बॉलीवूड तारे, एकाचा संसार तर २२ वर्षांनी मोडला

-चित्रपटसृष्टीला बहारदार संगीत देणारे ‘मोहम्मद खय्याम’, त्यांच्या जबरदस्त संगीताने केली प्रेक्षकांवर जादू


Leave A Reply

Your email address will not be published.