Monday, July 1, 2024

…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

आपल्या डायलॉगने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे आणि शॉटगण या नावाने प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, हे त्यांच्या अभिनयासोबतच अनेक वादविवादांनी चर्चेचा भाग  बनले होते. त्यांचे महानायक अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यासोबतही वाद झाले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असे सांगितले की, ते आता सगळे वाद विसरले आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा देत शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, पण काही कारणास्तव त्यांना ते चित्रपट नाही करता आले. त्यामध्ये ‘दीवार’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटांचा समावेश होतो.

त्यांनी असे सांगितले की, ‘हे सगळे चित्रपट आधी त्यांना मिळाले होते, पण त्यांच्या हातातून हे चित्रपट गेल्यानंतर हे सगळे चित्रपट अमिताभ बच्चन यांना मिळाले. पण हे सगळे चित्रपट केले नाही या गोष्टीचा त्यांना अजिबात पच्छाताप झाला नाही.

‘टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉम’सोबत बोलताना त्यांनी असे सांगितले की, त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर अजिबात राग नाहीये. त्यांच्याकडून सगळे चित्रपट अमिताभ बच्चन यांच्याकडे जात होते. पण ते म्हणाले की, चित्रपटसृष्टीत अशा गोष्टी होताच राहतात.

ते म्हणतात की, “अमिताभ बच्चन यांच्याबद्दल त्यांच्या मनात फक्त प्रेम, सन्मान आणि आदर आहे.” त्यांनी असे सांगितले की, जर त्यांना कोणी याबद्दल विचारले, तर ते फक्त एवढच सांगतील की, “जुन्या गोष्टींना विसरा. आता कालच्या गोष्टी जुन्या झाल्यात. नवीन वळणावर लिहूयात एक नवीन कहाणी.” अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे नेहमीच चांगले संबंध होते. पण राजेश खन्नासोबत त्यांची थोडी वादावादी झाली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, राजेश खन्नासोबत त्यांचे वाद चित्रपटावरून नाही, तर राजकारणावरून झाले होते. ते म्हणतात की, “राजेश खन्ना त्यावेळी खूप विचलित झाले होते, जेव्हा राजकारणात मी त्यांच्या विरोधात उभा होतो. खरं सांगायचं तर मला त्यांच्या विरोधात उभं राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण बाळकृष्ण आडवाणी यांना मी नाही असे म्हणू शकलो नाही. मी ही गोष्ट राजेशला सांगण्याची बऱ्याच वेळा प्रयत्न केला. परंतु त्याने माझ काहीच ऐकले नाही आणि त्याने माझ्याशी बोलणे बंद केले.”

त्यांच्या आणि राजेश खन्ना यांच्यातील वाद मिटविण्याची त्यांना कधी संधी नाही मिळाली. ते म्हणतात की, “मला त्यांची माफी मागायची होती. परंतु असे नाही होऊ शकले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला असे वाटत होते की, त्यांना भेटावे आणि कडकडून मिठी मारावी. पण असं काही व्हायच्या आधीच ते या जगातून निघून गेले.”

शत्रुघ्न सिन्हा आता चित्रपटात काम करत नाहीत. पण राजकारणात ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनी ‘दोस्ताना’, ‘कालीचरन’, ‘विश्वनाथ’, ‘शान’, ‘जानी दुश्मन’ या चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु तिथे वादावादी झाल्याने त्यांनी तो पक्ष सोडून दिला. ते आता काँगेस या राजकीय पक्षाचा भाग आहेत. त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा ही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

हे देखील वाचा