बॉलिवूडमधील दिग्गज गायक ‘मोहित चौहान’ यांना आज संपूर्ण जग ओळखतं. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. आपल्या करिअरमध्ये त्यांनी ‘मटरगश्ती’, ‘तूझे भूला दिया’, ‘सड्डा हक’ अशी अनेक गाणी गायली आहेत. परंतु खूप कमी व्यक्तींना या गोष्टीची माहिती असेल की, आपल्या सुरेल आवाजाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे गायक मोहित चौहान यांना त्यांच्या आयुष्यात गायक नाही, तर अभिनेता बनायचे होते. या गोष्टीचा खुलासा स्वत: मोहित यांनी केला आहे.
गायक मोहित चौहान यांनी स्वत: ही गोष्ट सांगितली आहे की, “मी थिएटर केले आहे. मी एनएसडीचा एक भाग होतो. स्टेजवर देखील मी अनेक नाटकांमधून काम केले आहे. मला एफटीआयआय सोबत काम करायचे होते. परंतु तिथे अभिनयाचा क्लास नव्हता. त्यामुळे मला संधी मिळाली नाही.”
https://www.instagram.com/p/BjOf26khwJC/?utm_source=ig_web_copy_link
मोहित यांना खरी ओळख बॅड सिल्क रूटच्या ‘डुबा डुबा’ या गाण्याने मिळाली. नंतर त्यांनी 2005 मध्ये आलेल्या ‘मैं, मेरी पत्नी ओर वो’ या चित्रपटात गुच्छा हे गाणे गायले. या एका गाण्यानंतर त्यांनी एआर रेहमान, प्रितम यांसारख्या संगीतकारांसाठी गाणी गायली.” अभिनयाबद्दल बोलताना मोहित असे बोलले की, “जर मला ऑफर मिळाली, तरीही अभिनय करायला मला आवडेल.”
https://www.instagram.com/p/BdmcvblHa3I/?utm_source=ig_web_copy_link
त्यानंतर 2006 मध्ये राकेश ओम प्रकाश मेहरा हे ‘रंग दे बसंती’ हा चित्रपटात बनवत होते. एआर रेहमान या चित्रपटाला संगीत देत होते, तेव्हा त्यांनी मोहित यांना गाण्यासाठी विचारले. या चित्रपटात त्यांनी ‘खून चला’ हे गाणे गायले. या गाण्यानंतरच त्यांच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळीचा एक जबरदस्त किस्सा देखील आहे. मोहित यांना हे गाणे रेकॉर्ड करायच्या आधी खूपच भीती वाटत होती. त्यांचे गाणे चांगले होईल की नाही याबाबत त्यांना खूप चिंता वाटत होती. त्यासाठी त्यांना रेहमान यांचा ओरडा देखील खावा लागला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-“ही माझी शेवटची पोस्ट…” म्हणत आमिर खानने ठोकला सोशल मीडियाला ‘राम राम!’
-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी