Monday, July 8, 2024

मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डॉग लव्हर’ सूनेचा खास अंदाज; कुत्र्यांसोबतचा डान्स व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यामुळे सध्या राजकीय जगतात बरीच खळबळ उडाली आहे. मिथुन यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत होते. अशातच आता त्यांची सून म्हणजेच मदालसा शर्मा हीदेखील चर्चेत आली आहे.

सुंदर टीव्ही अभिनेत्री असलेली मदालसा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना व्हिडिओ आणि फोटो शेअर करून स्वत: बद्दल अपडेट देत राहते. सोशल मीडियावर मदालसाचा एक नवीन व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या पाळीव कुत्र्याला हातात घेऊन डान्स करताना दिसत आहे. प्रसिद्ध गाणे ‘यू आर माय सोनिया’ यावर तिचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. या डान्स व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मदालसाने ‘लव्ह लव्ह लव्ह’ असे लिहिले आहे.

चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मदालसा शर्मा ‘डॉग लव्हर’ असल्याचे दिसून येते. यापूर्वीही मदालसाने तिच्या कुत्र्यासोबत एक गोंडस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

मदालसा शर्माने मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले आहे. मदालसा ही 90 च्या दशकात महाभारत मालिकेत देवकीची भूमिका साकारणाऱ्या, प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे.

तेलुगु चित्रपटसृष्टीतही मदालसा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 2009 च्या ‘फिटिंग’ या तेलगू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘शौर्य’ या कन्नड चित्रपटातही काम केले आहे.

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मदालसा शर्मा सध्या टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये काव्या झवेरीची भूमिका साकारत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली

हे देखील वाचा