Monday, July 1, 2024

टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

भारतीय टीव्हीवरील अनेक कार्यक्रम हे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे प्रमुख स्रोत आहे. अनेक चित्रपटांपेक्षा प्रेक्षक मालिकांना अधिक पसंती देत असतात. त्यातच अनेक अशा मालिका आहेत ज्या बॉलिवूडमधील चित्रपटांना मोठी टक्कर देत असतात. याच मालिकेतील अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अनेक कार्यक्रमांमुळे अधिक लोकप्रियता मिळवली आहे. ज्यांना सर्वाधिक मानधन मिळत आहे. या अभिनेत्रींनी मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनाही मागे टाकले आहे.

सध्या टीआरपीच्या यादीत रुपाली गांगुलीची ‘अनुपमा’ मालिका पहिल्या स्थानावर आहे. ज्यात ती प्रमुख भूमिका साकारत आहे. सात वर्षानंतर रुपाली मालिकेत परतली आहे. या मालिकेत काम करण्यासाठी तिने आपल्या मानधनात वाढ केली आहे. ही अभिनेत्री आपल्या एका दिवसाच्या शूट साठी सत्तर हजार इतके मानधन घेते. फक्त २५ दिवस शूट करणारी ही अभिनेत्री दरमहा निर्मात्याकडून एकूण १७ लाख ५० हजार इतके रुपये घेते.

रुपाली प्रमाणेच अन्य मालिकेत काम करणाऱ्या अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या दिवसाला एक लाखांच्या वर मानधन घेतात. आज आपण अशाच अभिनेत्रींवर नजर टाकूयात.

हिना खान
‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान टीव्हीवरील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या पर्वात झळकलेल्या या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिने एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेत कोमलिका हे पात्र साकारण्यासाठी दीड ते अडीच लाख इतके मानधन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच काळासाठी मालिकांपासून ब्रेक घेतला होता.

साक्षी तन्वर
‘कहाणी घर घर की’ या मालिकेत काम करणारी साक्षी तन्वरने बॉलिवूडमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. तिच्या त्या कार्यक्रमानंतर ती राम कपूर सोबत ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत दिसली होती. सोबतच आमिर खानच्या दंगल या चित्रपटात तिने काम केले आहे. साक्षीने ‘कोड रेड’, ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘त्योहारो की थाली’ या मालिकांचे सूत्रसंचालनही केले आहे. आपल्या एका एपिसोडचे शूट करण्यासाठी दीड ते अडीच लाख रुपये मानधन घेते.

जेनिफर विंगेट
जेनिफर विंगेट ही हिंदी मालिकेतील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरवात केली होती. तिची ‘दिल मिल गये’ ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर ती ‘सरस्वतीचंद्र’ आणि ‘बेपनाह’ या मालिकेत दिसली होती. सुरुवातीला ती आपल्या एका एपिसोड साठी ८० हजारांच्या पुढे मानधन घेत होती. त्यानंतर तिने आपल्या मानधनात वाढ केली होती. तिने कोम एमद्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आहे.

दिव्यांका त्रिपाठी
‘बनू मैं तेरी दुलहन’ आणि ‘ये है मोहब्बते’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली दिव्यांका त्रिपाठी फारच प्रसिद्ध आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमूळे तिने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आजकाल ती ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमात दिसत आहे. आपल्या एका एपिसोडसाठी ती एक ते दीड लाख इतके मानधन घेते.

अंकिता लोखंडे
अंकिता लोखंडेला तिच्या ‘पवित्र रीश्ता’ या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली होती. तिची आणि सुशांत सिंगची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘नच बलिये’ या कार्यक्रमात ती दिसली होती. नुकतेच तिने कंगना रणावतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

आपल्या प्रत्येक एपिसोडसाठी ती एक ते दीड लाख रुपये मानधन घेते. लवकरच ती पवित्र रिश्ता २ मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहेे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

हे देखील वाचा