Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘जर भारताने विश्वचषक जिंकला तर मी नग्न होईल’, अभिनेत्रीने त्यावेळी केलेल्या खळबळजनक विधानाने सर्वजण झाले होते आश्चर्यचकित

बॉलिवूडमध्ये आपले बोल्ड वक्तव्य, व्हिडिओ आणि फोटोंमुळे अनेक अभिनेत्री चर्चेत असतात. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे ‘पूनम पांडे’ होय. तिने आपल्या बोल्ड अंदाजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती फोटो अन् व्हिडिओ शेअर करत आपली उपस्थिती दर्शवत असते. गेल्याच महिन्यात तीने आपला ३०वा वाढदिवस साजरा केला. ती तिच्या बोल्डनेसमुळे अनेकदा वादांत अडकली आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊयात…

पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी दिल्ली येथे झाला होता. तिने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पूनम पांडे प्रथम सोशल मीडियावर तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिचा सेमी न्यूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासोबतच ही अभिनेत्री 2011 खूप चर्चेत आली, जेव्हा तिने एक खळबळजनक वक्तव्य केले होते. तिचे वक्तव्य ऐकून सर्वच चकित झाले होते. “जर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला तर मी नग्न होईल,” असे ती म्हणाली होती. तथापि, नंतर अभिनेत्रीने असे काही केले नाही.

पूनम पांडेने 2013 साली ‘नशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये तिच्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात शिवम पाटील तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाईलमुळे बरीच चर्चेत होती. त्यानंतर तिने ‘द जर्नी ऑफ कर्मा’, ‘मालिनी अँड को’ आणि ‘दिल बोले हडिप्पा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तरीही तिला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही.

बोल्ड स्टाईलमुळे चाहत्यांनी पूनम पांडेची तुलना माजी ऍडल्ट स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीशी केली. वृत्तानुसार, पूनम पांडे त्यावेळी म्हणाली होती की, “मी या तुलनेने कंटाळली आहे. लोक माझी तुलना सनी लिओनीशी का करतात माहित नाही. मी अभिनय करण्यासाठी आहे आणि तुम्हाला मी अभिनय करतानाच दिसणार आहे. चित्रपटात अंतरंगी सीन आहेत. मात्र, एक लव्ह स्टोरीही आहे. मी ऍडल्ट स्टार नाहीये. कृपया माझी तुलना सनी लिओनीशी करू नका.” पूनम पांडेने हे विधान 2013 साली तिच्या ‘नशा’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान केले होते.

गेल्या वर्षी पूनम पांडे अश्लील व्हिडिओ बनवल्यामुळे वादात सापडली होती. तिच्यावर गोव्यात अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप होता. मिळालेल्या वृत्तानुसार, गोव्यातील कनाकोना पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. पूनम पांडेचा अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप त्या व्यक्तीवर करण्यात आला होता.

यापूर्वी पूनम पांडेने गोव्यात सॅम बॉम्बेशी लग्न केले होते. दुसर्‍याच दिवशी तिने तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला. पूनमला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. पूनमच्या या तक्रारीनंतर सॅम बॉम्बेला ताब्यात घेण्यात आले. नंतर दोघे मुंबईला आल्यावर त्यांच्यात करारही झाला होता. मात्र, याक्षणी ते दोघे एकत्र राहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सैफच्या दुसऱ्या लग्नाला लावली होती साराने हजेरी, पहिल्या बायकोने स्वत: केले होते तयार

-अभिमानास्पद! महानायक अमिताभ बच्चन यांना मिळणार आंतरराष्ट्रीय पुरस्कार; प्रसिद्ध दिग्दर्शक करणार सन्मानित

-वाह उस्ताद वाह! ‘तबल्याचे जादूगार’ झाकीर हुसेन यांनी शबाना आझमीसोबत केलंय चित्रपटात काम, तर ‘ग्रॅमी’ दोनदा खिशात

हे देखील वाचा