आपलं स्वत:चं एक आलिशान घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. असेच स्वप्न बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने पूर्ण केले आहे. तो केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या उत्कृष्ट डान्स शैलीमुळेही सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला एकदा नाही दोनदा नाही, तर तब्बल 6 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत भरघोस यश मिळाल्यानंतर त्याने त्याचे स्वप्नातले घर घेतले आहे.
ऋतिक रोशन याचे मुंबईमधील ‘जुहू’ या परिसरात एक आलिशान घर आहे. या घराला पाहून या गोष्टीची माहिती मिळते की, त्याला सगळ्या पारंपरिक गोष्टी आवडतात. माध्यमातील वृत्तानुसार, ऋतिकचे 3000 स्क्वेअर फूटचे आलिशान घर आहे. घरातील प्रत्येक कोपरा त्याच्या आवडीने सजवला आहे. ऋतिक रोशन हा आपल्या चाहत्यांमध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हणून प्रसिद्ध आहे.
ग्रीसमधील सँटोरिनी हे शहर पांढऱ्या आणि निळ्या आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. ही जागा ऋतिकच्या आवडीच्या स्थळांपैकी एक आहे. त्यामुळेच ऋतिकने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा उपयोग करून आपले घर सजवले आहे. त्याच्या घरात एक मोठं ग्रंथालय देखील आहे.
ऋतिकने त्याच्या घराच्या आतमध्येच ऑफिस बनवले आहे आणि ते खूप हवेशीर आहे. त्याने त्याच्या ऑफिसमध्ये पेंटिंग आणि लाकडाचे डेकोरेशनही केले आहे. यासोबतच अनेक सुंदर आणि आकर्षक दगडांचा वापर देखील घरात केला आहे. घराच्या भिंतींवर प्रेरणादायी संदेश लिहिले आहेत. त्याच्या घरात तीन मास्कवाला एक पियानो देखील आहे. या आर्टवर्कला स्वत: ऋतिक आणि त्याची मुले रिहान-रिदान यांनी मिळून बनवले आहे. त्याचे हे घर सुंदरच नव्हे, तर खूप हवेशीर आणि आरामदायक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सैफच्या दुसऱ्या लग्नाला लावली होती साराने हजेरी, पहिल्या बायकोने स्वत: केले होते तयार