बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी ‘भेडिया‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कलाकार त्याचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. अलीकडेच, त्याने क्रिती सॅनन हिच्यासोबत बिग बॉसच्या सेटवर पोहोचून या चित्रपटाची जोरदार प्रमाेशन केले. क्रिती आणि वरुणसोबत सलमान खाननेही खूप धमाल केली. दोघांनी एक खेळ खेळला आणि बाेलता – बाेलता सलमान खानने वरुण धवनबद्दल खुलासा केला.
कलर्सने बिग बॉसचा प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यामधे सलमान (salman khan) वरुण (varun dhawan)आणि क्रिती (kriti sanon) हिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याने दोन्ही कलाकारांसाेबत एक गेम खेळला, ज्यामध्ये त्यांना एखाद्या वस्तूला स्पर्श करून ते काय आहे हे ओळखायचे होते. या गेमदरम्यान सलमानने वरुणशी संबंधित एक मोठी हिंट दिली. सलमान खान काही गोष्टी दाखवतो व वरुण आणि क्रितीला सांगतो की, “त्यांना त्यांच्या चित्रपटातील गाण्यांशी संबंधित हिंट्स देण्यात येतील. ते काय आहे हे दोघांनाही ओळखावे लागेल.”
View this post on Instagram
खेळाच्या शेवटी, सलमान वरुणला एक सॉफ्ट टॉय देतो. जेव्हा वरुणने याचे कारण विचारताे तेव्हा सलमान त्याला चिडवत सांगतो की, “हे त्याच्या मुलासाठी आहे. जर मुल तिथे नसेल तर तो येईल.” हे ऐकून वरुण धवन लाजताे. सलमान खानच्या या कमेंटमुळे वरुण बेबी प्लॅनिंग करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
वरुणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बाेलायचे झाले तर, त्याने जानेवारी 2021 मध्ये गर्लफ्रेंड नताशा दलालशी लग्न केले. दोघेही बालपणीचे मित्र आहे. (bollywood actor varun dhawan and natasha dalal parenthood rumour actor promote bhediya with kriti sanon in salman khan show bigg boss)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! राजकुमार रावचा ‘एवढा’ हाेता पगार, लहान मुलीना डान्स शिकवत चालवले घर
अबब! अमिताभ बच्चन ब्लॉगमध्ये म्हणाले, ‘मी राकेश कुमारच्या अंत्ययात्रेला जाणार नाही’