काय भाऊ? पाहिली का नाही सलमान खानची होणारी वाहिनी?


बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याचं कुटुंब हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. सलमानचा धाकटा भाऊ अरबाज खान याचा २०१७ मध्ये आधीची पत्नी मलायका अरोरा हिच्या सोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर या दोघांनीही आपल्या आयुष्यात नव्या जोडीदाराची निवड केली.

विशेष म्हणजे दोघांनीही त्यांच्यापेक्षा बऱ्याच लहान असणाऱ्या व्यक्तींना प्रेयसी आणि प्रियकर म्हणून निवडलं. जसं की आपल्याला ठाऊकच आहे की मलायका अरोरा ही सध्या वयाने तिच्याहून नऊ वर्षे लहान असणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे.

तर अरबाज हा वयाने त्याच्यातून तब्बल बावीस वर्षे लहान असणारी इटालियन मॉडेल, अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी हिला २०१८ पासून डेट करत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत अशा चर्चा सध्या बीटाऊनमध्ये सुरू आहेत.

नुकतीच जॉर्जिया एंड्रियानी ही तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जॉर्जिया जगभर फिरत असते अशातच गेला काही काळ ती दुबईमध्ये वास्तव्यास आहे. नुकतंच दुबईच्या बिचवर तिने बिकिनी फोटोशूट केलं आणि तिने हे फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना इतके आवडले की त्यांनी अक्षरशः तिच्या फोटोजवर लाईक्सचा वर्षाव केला. जॉर्जिया या फोटोतील बिकिनी लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. भाईजान सलमानच्या होणाऱ्या या हॉट वहिनीबद्दल आपण आणखीन काही गोष्टी जाणून घेऊयात.

जॉर्जिया एंड्रियानी हीचा जन्म २० जून १९८९ ला इटली मध्ये झाला असून ती सध्या ३१ वर्षांची आहे. जॉर्जिया ही एक इटालियन मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. जॉर्जियाचं बालपण हे इंग्लंड आणि इटली या दोन देशांमध्ये गेलं. तिने तिचं बॉलिवूड पदार्पण हे गेस्ट इन लंडन या सिनेमातून केलं. तिने यानंतर आय लव्ह यु ट्रुली या नावाचा एक सिनेमा केला. गेल्या काही काळात तिने भारतीय गायक मिका सिंह याने किशोर कुमार यांच्या रूप तेरा मस्ताना या गाण्याच्या केलेल्या रिमेकच्या म्युझिक व्हिडीओ मध्ये देखील काम केलं आहे. यानंतर लवकरच तिचा नवा सिनेमा वेलकम टू बजरंगपूर या सिनेमाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.