Saturday, February 22, 2025
Home अन्य अर्चना पुरण सिंग यावेळी नसणार ‘द कपिल शर्मा शो’चा भाग? पाहा यावर अर्चना यांनी काय दिली प्रतिक्रिया

अर्चना पुरण सिंग यावेळी नसणार ‘द कपिल शर्मा शो’चा भाग? पाहा यावर अर्चना यांनी काय दिली प्रतिक्रिया

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि मोठा विनोदी शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ ओळखला जातो. या शोमधील प्रत्येक कलाकार हा सर्वांच्या एकदम जवळचा आहे. लोकांना त्यांचे टेन्शन विसरून हसायला लावणाऱ्या या शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा आहे. या शोचे वेगवेगळे सिझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही महिन्यांपूर्वी हा शो बंद झाला. मात्र आता हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधीच या शोची जज असलेल्या अर्चना पुरण सिंगबद्दल नुकतीच एक बातमी आली होती.

या शोमध्ये जज ची भूमिका साकारणारी अर्चना पूर्ण सिंगने हा शो सोडल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आत खुद्द अर्चना पुरण सिंग यांनीच यावर भाष्य केले आहे. एका मोठ्या वृत्तसंस्थेशी बोलताना अर्चना यांनी सांगितले की, “मला याबद्दल काहीच कल्पना नाही की, बाजारात अशा काही बातम्या सुरु आहेत. नक्कीच मी या शोच्या येणाऱ्या भागात दिसणार आहे. मागच्या वेळेस देखील मी एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना अशा अफवा उडवल्या गेल्या होत्या. यावेळी देखील मी एका सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे आणि दुसरीकडे अशा अफवा येत आहे. मात्र मी अशा अफवांना बिलकुल भाव देत नाही. मला ह्युमर खूप आवडतो. मी जेव्हा कलाकरांना परफॉर्मन्स करताना बघते तेव्हा मला खूप आनंद मिळतो. मी या शोचा भाग असणार आहे याचा मला खूप आनंद आहे.”

अर्चना मागील एक वर्षांपासून सोनी टीव्हीच्या कॉमेडी शोचा हिस्सा आहेत. अर्चना नेहमी त्यांच्या हसण्यासाठी ओळखल्या जातात. कपिल शर्माच्या या सिझनमध्ये देखील त्या जजच्या भूमिकेत असणार आहे. अर्चना यांनी नवजोत सिंग सिद्धू शोमधून गेल्यानंतर शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा