Tuesday, July 9, 2024

सकारात्मक! टीव्ही अभिनेता असलेल्या अर्जुन बिजलानीने नवीन वर्षात सोडली ‘ही’ वाईट सवय

कलाकार आणि त्यांच्या वाईट सवयी अथवा व्यसनं यांच्या चर्चा नेहमीच त्यांच्या फॅन्समध्ये आणि मीडियामध्ये रंगताना दिसतात. अनेक कलाकार हे त्यांच्या व्यसनांना मान्य करतात तर काही जगासमोर व्यसनं करताना कचरतात. आपल्या वाईट सवयी मान्य करणे आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सगळ्यांनाच जमते असे नाही. तरीही अनेक कलाकार आपल्या वाईट सवयी सोडण्याचे आव्हान स्वीकारतात आणि त्यात यशस्वी होतात. असेच काहीसे घडले आहे, टीव्ही कलाकारासोबत.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता आणि सूत्रसंचालक असलेला अर्जुन बिजलानी तुफान प्रसिद्ध आहे. एक रोमॅंटिक अभिनेता म्हणून त्याने त्याची इमेज तयार केली, त्यानंतर तो विविध मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आला. आता तो अनेक वेगवेगळ्या रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो. अर्जुनला वरवर बघता तो अतिशय साधा जेंटलमॅन वाटतो. मात्र त्याला एक घाणेरडी सवय आहे. अर्जुन चेन स्मोकर असून तो या सवयीच्या अधीन गेला होता. मात्र आता त्याने ही सवय सोडण्याचा निर्धार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या अर्जुन बिजलानीने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एक उत्तम संकल्प केला आहे. अर्जुनने नवीन वर्षात त्याची एक वाईट सवय सोडायचे ठरवले आहे. अर्जुनला धूम्रपानाची सवय आहे. मात्र आता त्याने त्याच्या मुलासाठी ही सवय सोडायचे ठरवले आहे. या गोष्टीमुळे त्याचे कुटुंब खूपच खुश असून, फॅन्स देखील त्याचे कौतुक करत त्याला पाठिंबा देत आहेत. याची माहिती खुद्द अर्जुनेच एका मुलाखतीमध्ये दिली आहे. स्मोकिंगसोबतच त्याने दारू देखील सोडली असल्याचे सांगितले आहे. तो नेहमीचीच ड्रिंक्स घेतो असे नाही मात्र कधीतरी पार्टीमध्ये घेतो. ते देखील घेणे त्याने बंद केल्याचे सांगितले.

अर्जुनने मुलाखतीमध्ये सांगितले की, “एक आठवडा झाला असून त्याने अजून सिगरेट ओढली नाही. माझा नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण होत आहे. खरं सांगायचे तर मला खूपच छान वाटत आहे. स्मोकिंग सोडणे वाटते तितके सोपे नाही, मात्र मी प्रयत्न करत आहे. मी हा निर्णय माझ्या मुलासाठी घेतला आहे. कारण मला त्याच्यासमोर एक उत्तम उदाहरण सादर करायचे आहे. या नवीन वर्षाची सुरुवात मी साकारत्मकतेने केली आहे.”

दरम्यान अर्जुन बिजलानीने त्याचे करियर २००४ साली आलेल्या ‘कार्तिक’ मालिकेपासून सुरु केले. यानंतर २००८ साली आलेल्या ‘मिले जब हम तुम’ मालिकेने त्याला लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्याने नागीण मालिकेत देखील काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न

‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल

हे देखील वाचा